शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत २४ पासून आंबा महोत्सव; रत्नागिरी, देवगड हापूससह स्थानिक केशर आंबा उत्पादकही येणार

By अशोक डोंबाळे | Updated: May 21, 2024 18:23 IST

सांगली : कृषी विभाग व कृषी पणन मंडळामार्फत दि. २४ ते २६ मे २०२४ या कालावधीत उत्पादक ते ग्राहक ...

सांगली : कृषी विभाग व कृषी पणन मंडळामार्फत दि. २४ ते २६ मे २०२४ या कालावधीत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेंतर्गत ‘सांगलीआंबा महोत्सव’चे कच्छी जैन भवन, सांगली येथे आयोजन केले आहे. या महोत्सवाचा लाभ सांगलीकरांनी घ्यावा, असे आवाहन कृषी पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.डॉ. सुभाष घुले म्हणाले, विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळण्यासाठी हा आंबा महोत्सव आयोजित केला आहे. आंबा महोत्सवाचे उद्घाटन २४ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व पोलिस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित राहणार आहेत. महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, स्थानिक केशर आंबा उत्पादक व इतर विविध जातींचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. महोत्सवामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंबा व स्थानिक केशर आंबा उत्पादकांकडून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीMangoआंबा