शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 07:06 IST

Maharashtra Assembly Election 2024 : आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केले.

Maharashtra Assembly Election 2024 : तासगाव (जि. सांगली) : माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाला. त्याच्या खुल्या चौकशीसाठीच्या फाइलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सही केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही फाइल मला दाखवली. आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केले.

प्रचारसभेत ते म्हणाले, २०१४च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच राष्ट्रवादीने भाजपला विचारधारा सोडून बाहेरून बिनशर्त पाठिंबा दिला. राष्ट्रवादीची स्थापना सोनिया गांधींना विरोधातून झाली. मात्र लगेच १९९९ मध्ये काँग्रेससोबत सरकार स्थापन केले, हे कसे काय चालते, हा प्रश्न आहे. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

...तर आर. आर. मुख्यमंत्री झाले असतेमुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांनी राजीनामा देऊन अंजनी गाठली; पण याची कल्पना मला दिली नाही. त्यानंतर त्यांना मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष केले. २००४ मध्ये राज्यात आपले सर्वाधिक आमदार होतील, अशी पैज लागली होती, ती त्यांनी जिंकल्यानंतर मी त्यांना पैजेपोटी महागडी स्कोडा गाडी दिली. त्याच वेळी ते मुख्यमंत्री झाले असते; पण मुख्यमंत्रिपदावरील दावा पवार साहेबांनी का सोडला हे माहिती नाही, असे अजित पवार म्हणाले.

आबांचा मुलगा म्हणाला... आर. आर. आबा प्रामाणिकपणे, स्वच्छपणे काम करत होते. आबांना जाऊन साडेनऊ वर्षे झाली. आज त्यांच्यावर आरोप झाले, ते पाहून अतिशय दु:ख झाले. अजित पवार ज्येष्ठ आहेत. त्यांनी जे आरोप केले, ते कुटुंब म्हणून वाईट वाटले. आबा हयात असते तर आबांनी त्याला उत्तर दिले असते. या वक्तव्याच्या विरोधात जनता उत्तर देईल, या शब्दात आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024