Maharashtra Assembly Election 2019 विजयाचा पंचम धमाका करीत महाआघाडीची दिवाळी, तर फुसक्या आपटबारने महायुतीच्या आनंदावर विरजण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:34 IST2019-10-25T17:24:19+5:302019-10-25T17:34:25+5:30
Maharashtra Assembly Election 2019 सत्तेमुळे आलेला कैफ, बेदिली, गटबाजी, नाराजी याचे परिणाम अलीकडे दिसू लागले. महापुरातील मंत्री-आमदारांच्या सुमार कामगिरीने तर कहर केला. या निवडणुकीत त्या प्रतिक्रिया उमटल्या.

Maharashtra Assembly Election 2019 विजयाचा पंचम धमाका करीत महाआघाडीची दिवाळी, तर फुसक्या आपटबारने महायुतीच्या आनंदावर विरजण
श्रीनिवास नागे ।
सांगली : पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील चार जागा जिंकून धडक मारणाऱ्या भाजपला यंदा दोन जागा गमवाव्या लागल्या, तर दोन ठिकाणी जागा राखताना घाम फुटला. शिवसेनेला एक जागा शाबूत ठेवता आली, तर तीन जागांवर पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. राष्टÑवादीने मात्र थंड डोक्याने ह्यकरेक्ट कार्यक्रमह्ण करत तीन जागा पटकावल्या, तर काँग्रेसनेही दोन आमदार निवडून आणले. या निकालाने युतीला घरघर लागल्याचे आणि आघाडीची सुगी पुन्हा सुरू झाल्याचे संकेत मिळाले.
एकेकाळी काँग्रेस-राष्टÑवादीचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीत पाच वर्षांपूर्वी उलथापालथ झाली. दुसºया फळीतील नेते भाजप-शिवसेनेत गेले. त्या ताकदीवर लोकसभा-विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर युतीने ताबा मिळवला. मात्र काही दिवसांतच या दोन्ही पक्षांची ह्यकाँग्रेस-राष्टÑवादीह्ण बनली. सत्तेमुळे आलेला कैफ, बेदिली, गटबाजी, नाराजी याचे परिणाम अलीकडे दिसू लागले. महापुरातील मंत्री-आमदारांच्या सुमार कामगिरीने तर कहर केला. या निवडणुकीत त्या प्रतिक्रिया उमटल्या.
इस्लामपूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ या तिन्ही मतदारसंघांत भाजपने तयारी केली होती. मात्र युतीच्या जागावाटपात या जागा शिवसेनेकडे गेल्या. इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये शिवसेनेला उमेदवार आयात करावे लागले, तर पलूस-कडेगावात जिल्हाप्रमुखाला बळेबळे उभे करावे लागले. इस्लामपूरमध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी बंडखोरी केली, तर तासगावमध्ये खासदारांच्या गटाने राष्टÑवादीचे घड्याळ चालवले. पलूस-कडेगावमध्ये भाजप प्रचारापासूनच दूर राहिला. परिणामी तिन्ही जागी सेनेचा दारूण पराभव झाला.
जतमध्ये आमदाराविरुद्धचे बंड मोडून काढण्याऐवजी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरांना रसद पुरवली. ती मतविभागणी काँग्रेसच्या पथ्यावर पडली. शिराळ्यातही भाजपला अपक्षाला फटका बसला. खरे तर या अपक्षाला रोखणे भाजपला शक्य असतानाही तसे प्रयत्न झाले नाहीत!
सांगली आणि मिरजेतील दोन्ही जागांवर भाजपची जीत अपेक्षित होती. मात्र मताधिक्य इतके कमी असेल, याचा अंदाज कोणालाच नव्हता. लाखाच्या वर मताधिक्य मिळवण्याच्या गर्जना करणाºया सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडेंना मिरजेत केवळ तीस हजारावर ह्यलीडह्ण मिळाले, तर सांगलीतून सुधीर गाडगीळ यांना पहिल्या काही फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांनी घाम फोडला.
- या निकालाने युतीला घरघर लागल्याचे आणि आघाडीची सुगी पुन्हा सुरू झाल्याचे संकेत मिळाले.
या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?
राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला हात देण्याचा छुपा ह्यअजेंडाह्ण सोडून पहिल्यांदाच काँग्रेस-राष्टÑवादीसाठी निकराचे प्रयत्न केले.
काँग्रसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांचा दीड लाखाहून अधिक मताधिक्याने एकतर्फी विजय.
सांगली-मिरजेत भाजपच्या विरोधातील ह्यअंडरकरंटह्ण निकालाच्या आकडेवारीतून पुढे आला.
विशेषत: सुरेश खाडे यांच्या विरोधातील जनमत उघड झाले. नाराजी कुणाच्या पथ्यावर, कुणाच्या मुळावर . जत आणि शिराळा या दोन्ही जागा अडचणीत असल्याचे दिसून आल्यानंतर भाजपने तातडीने दुरुस्ती मोहीम राबवली. अमित शहा यांची जतला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामेरीत सभा झाली, पण दोन्ही जागी नाराजीच अधिक होती. त्यातच बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली.
च्काँग्रेस-राष्टÑवादीने आधीपासूनच तयारी करून उमेदवारीचा घोळ घातला नसता, मुबलक रसद पुरवून नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवली असती, तर सांगली-मिरजेतील निकालही बदलले असते, असे आकडेच बोलतात!
गटबाजी इथेही आणि तिथेही...
च्शिराळ्यात काँग्रेसच्या सत्यजित देशमुखांचा भाजपप्रवेश आणि शिवाजीराव नाईक यांच्यासोबतची हातमिळवणी मतदारांना पटली नाही. त्यातच सम्राट महाडिक यांनी बंड करून शिवाजीराव नाईक यांचीच जादा मते खाल्ली.
च्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शह-काटशहाच्या राजकारणाची लागण सांगली जिल्ह्यातही झाली आहे. फडणवीस यांच्या पाठबळावर खासदार संजयकाका पाटील गट प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या गटावर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही, हेही दिसून आले.
भाजपच्या -हासपर्वाची नांदी?
च्महापुराच्या काळात आणि पूर ओसरल्यानंतर राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजित कदम, काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी राबवलेले मदतकार्य, पुरात प्रत्यक्ष उतरूण केलेले काम यामुळे त्यांची प्रतिमा उंचावली गेली. याउलट भाजपचे मंत्री, खासदार, आमदार यांची पुराच्या काळातील अनुपस्थिती, मदतीच्या घोषणांची न झालेली पूर्तता यामुळे विरोधात सुप्त लाट तयार झाली. भाजप-शिवसेनेच्या जागावाटपातील घोळही महायुतीच्या -हासपर्वाची नांदी ठरला.