शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

माधवनगर रेल्वे स्थानकाचं रुपडं बदलतंय!

By admin | Updated: March 12, 2015 23:54 IST

रंगरंगोटी सुरू : दहा वर्षांनंतर प्रशासनाची नजर; प्रवाशांची संख्या वाढण्याची गरज--लोकमतचा प्रभाव

सचिन लाड - सांगली  माधवनगर (ता. मिरज) येथील रेल्वे स्थानकाच्या दुरवस्थेचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. गेल्या दहा दिवसांपासून स्थानकाच्या इमारतीची रंगरंगोटी करण्याचे काम सुरु आहे. परिसरातील झाडेझुडपे काढली जात आहेत. तब्बल दहा वर्षांनंतर रेल्वे प्रशासनाची नजर या स्थानकाकडे गेल्याने, सुधारणांच्या कामाला गती आली आहे. दिवसभरात दोनच रेल्वे थांबत असल्या तरी, सर्व सोयींनीयुक्त स्थानक झाल्यास प्रवाशांची संख्या वाढू शकते.
माधवनगर जकात नाक्यापासून दीड किलोमीटर अंतरावर हे रेल्वे स्थानक आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. कोल्हापूर-पुणे, पुणे-कोल्हापूर व सातारा-कोल्हापूर या तीनच पॅसेंजर येथे थांबतात. पंधरा वर्षांपूर्वी हे स्थानक सुस्थितीत होते. तिकीट घर व प्रवाशांना थांबण्यासाठी हॉल होता. तिकीट विक्री करणारा कर्मचारी रेल्वे येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर यायचा. रेल्वे येऊन गेली की, तो पुन्हा निघून जायचा. पण स्थानक गैरसोयीचे असल्याने प्रवाशांची संख्या घटत गेली. त्यामुळे स्थानकही बंद करण्यात आले. हीच संधी साधून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. स्थानकाच्या छतावरील सिमेंटचे पत्रे, अँगल काढून नेले. शिल्लक असलेल्या खिडक्या भिंती पोखरून नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या बाकांची मोडतोड केली आहे. स्थानकाच्या बाजूने असलेल्या संरक्षक लोखंडी जाळीच्या पट्ट्याही काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. भिंतीवर अश्लील मजकूर लिहिला आहे.
या स्थानकाच्या दुरवस्थेवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. याची प्रशासनाने दखल घेऊन स्थानकाची रंगरंगोटी केली आहे. परिसरातील झाडेझुडपे काढून टाकली आहेत. स्थानकाच्या इमारतीला अद्याप दारे व खिडक्या बसविलेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. स्थानक सुधारणेचे हे काम टप्प्या-टप्प्याने केले जाणार असल्याचे समजले.

नशेच्या गोळ्यांचा खच कायम
स्थानकाच्या रंगरंगोटीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाले आहे. सध्या येथे कोणतेही काम सुरु नाही. त्यामुळे अश्लील चाळे करणाऱ्या आंबटशौकीनांची वर्दळ पुन्हा वाढली आहे. स्थानकाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या, नशेच्या गोळ्यांचा खच पडला आहे. निरोधही मोठ्या प्रमाणात फेकून दिलेले दिसतात. विजेची कोणतेही सोय नाही. यामुळे रात्रीच्यावेळी मेणबत्ती लावून पार्ट्याही सुरु असतात. हे प्रकार रोखण्यासाठी आता प्रशासनाने येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची सोय करणे गरजेचे आहे.
स्थानकाच्या छतावरील सिमेंटचे पत्रे, अँगल काढून नेले असून मोठे नुकसान केले आहे. या स्थानकावर सुरक्षा रक्षक ठेवण्याची गरज आहे. तरच येथे प्रवाशांची संख्या वाढणार आहे.
हे रेल्वे स्थानक माधवनगर, शांतिनिकेतन परिसरातील नागरिकांच्या सोयीचे आहे.