शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अडत्यांच्या मनमानीने गुऱ्हाळांची हानी

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

व्यापाऱ्यांकडूनही अडवणूक : गूळ उत्पादकांची सातत्याने पिळवणूक--गुऱ्हाळघरांना घरघर-२

सहदेव खोत -- पुनवत---सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळ उद्योगाच्या दिवसेंदिवस होणाऱ्या हानीला बाजारपेठेतील अडते व गूळ व्यापारी यांची मनमानी कारणीभूत ठरू लागली आहे. जिवाचे रान करून तयार केलेला गूळ बाजारपेठेत घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला दरातच चिरडले जात असल्यामुळे, या शेतकऱ्यांची आर्थिक हानी होऊ लागली आहे आणि हेच गुऱ्हाळ उद्योगाच्या ऱ्हासाचे कारण ठरत आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ उत्पादकांना कोल्हापूर, कऱ्हाड व सांगली अशा बाजारपेठा उपलब्ध आहेत. या तीनही बाजारपेठांमध्ये शेकडो अडत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. वास्तविक गूळ उत्पादक व व्यापारी यांच्यामधील दुवा म्हणजे हा अडत दुकानदार. मात्र सद्यस्थितीत गूळ उत्पादक शेतकऱ्यांची चिंता ना या अडत्यांना आहे, ना व्यापाऱ्यांना. गूळ उत्पादकांची या दोघांकडून सातत्याने पिळवणूक होत आहे.गुऱ्हाळघरात जिवाचा आटापिटा तयार केलेला गूळ, चांगला दर मिळेल या आशेवर शेतकरी या अडत्यांच्या पेढीवर पाठवतात. शेतकऱ्याने गुळाची दहा कलमे पाठविली, तर एखाद्याच कलमाला मध्यम ते काहीसा चांगला दर मिळतो. उर्वरित कलमे नीचांकी भावानेच जातात. अडत्यांकडून गूळ खरेदीदार वाट्टेल त्या भावाने गूळ खरेदी करतात. बहुतांशी गुळाचे सौदे हे शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीतच चालतात. त्यामुळे आपल्या गुळाचा काय दर झाला, हे त्या शेतकऱ्याला दुसऱ्याकडूनच समजते. त्यामुळे मिळेल तो दर घेऊन गप्प बसण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर गत्यंतर नसल्याचे दिसून येत आहे.अडते-वाहतूकदार : एक ‘अर्थ’पूर्ण कनेक्शनएकच वाहतूकदार अनेक गुऱ्हाळघरांतील गूळ बाजारपेठेत पोहोचवतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजारपेठ पाहिलेलीच नसते. आपल्याच दुकानात गूळ मिळविण्यासाठी अडत दुकानदार व वाहतूकदार यांच्यात एक ‘अर्थ’पूर्ण कनेक्शन असते. यामध्ये बिचारा शेतकरी मात्र यापासून दूरच राहतो व बऱ्याचवेळा चांगल्या दराला मुकतो.दरातील फरकामुळे शेतकऱ्यांची मेहनत वायाएकंदरीत, गूळ व्यापारी व अडत्यांना या शेतकऱ्यांच्या कष्टाची अजिबात माहिती नसते. त्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. दरात फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जात आहे. वास्तविक गूळ उत्पादक टिकला तरच आपला व्यवसाय चालेला, याचा अडते व गूळ व्यापाऱ्यांना विसर पडत चालल्याने, या उद्योगात ‘गूळ व्यापारी मालामाल व शेतकरी कंगाल’ असेच चित्र निर्माण झाले आहे.