यादी बनविली : जामीन रद्दच्या हालचाली; तडीपारीचा पुन्हा प्रस्ताव

By Admin | Updated: December 19, 2014 23:52 IST2014-12-19T23:43:14+5:302014-12-19T23:52:42+5:30

या गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने

List made: bailment cancellation; The proposal again | यादी बनविली : जामीन रद्दच्या हालचाली; तडीपारीचा पुन्हा प्रस्ताव

यादी बनविली : जामीन रद्दच्या हालचाली; तडीपारीचा पुन्हा प्रस्ताव

सांगली : खून, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सांगलीतील ५४ गुन्हेगारांची यादी बनविण्यात आली आहे. यातील अनेक गुन्हेगार जामिनावर बाहेर आले आहेत, तर काहींची तडीपार कारवाईची मुदत संपली आहे. या गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेच्या पथकाला दिले आहेत.
पोलीसप्रमुख सावंत म्हणाले की, गुंड बाळू भोकरे, छोट्या ऊर्फ विक्रांत बाबर, सचिन ऊर्फ टारझन जाधव, गणेश भोसले, मिणच्या गवळी, कुणाल गालिंदे, पप्पू फाकडे, राहुल माने, सुनील भोसले, रियाज अपराध, बंड्या केंगार यांच्यासह ५४ गुन्हेगारांची यादी बनविण्यात आली आहे. या गुन्हेगारांकडून शहरात सातत्याने गुन्हे घडले आहेत. यातून अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल असलेले खटले प्रलंबित आहेत. यातील काही गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले होते, तर काहीजण जामिनावर बाहेर आले आहेत. जे जामिनावर आहेत, त्यांचे जामीन रद्द करावेत, अशी न्यायालयात विनंती केली जाणार आहे.
सावंत म्हणाले की, सध्या हे गुन्हेगार काय करतात, त्यांची उठ-बस कुठे असते, त्यांचे साथीदार कोण, त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे साधन काय, याची सर्व माहिती घेण्याचे आदेश सांगली शहर व विश्रामबाग ठाण्यातील डीबी पथकाला दिले आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न व दरोड्याच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर पोलिसांतर्फे बाजू मांडण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली आहे. या गुन्हेगारांना जामीन कसा मिळाला? तपास अधिकारी सुनावणीवेळी हजर होते का? याची सर्व माहिती घेण्याचे आदेश पथकाला दिले आहेत.
गुन्हेगारांविरुद्ध तक्रार आली, तर त्यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची सूचना केली आहे. सच्या टारझन याचा जामीन रद्द करण्याची न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. गुंड महंमद ऊर्फ म्हमद्या नदाफ, बंड्या ऊर्फ बंडोपंत दडगे, मध्या ऊर्फ मधुकर वाघमोडे हे गुन्हेगार कारागृहात आहेत, असेही सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कारागृहात सुटला अन...
सावंत म्हणाले की, अनेकदा सांगली न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर गुन्हेगार मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळवितात. याची पोलिसांना माहिती मिळत नाही. त्यामुळे आता कारागृहात जामिनावर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांची यादी काढण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषणला दिले आहेत. जामिनावर कारागृहातून बाहेर आला की, त्याला ताब्यात घ्यायचे. त्याच्या हाताचे ठसे घेऊन, तो कुठे जाणार आहे, याची चौकशी करुनच त्याला सोडून देण्याचे आदेश दिले आहेत. तो कुठे आहे? काय करतो? याची माहिती आठवड्यातून किमान एकदा तरी घेण्याची सूचनाही केली आहे.

Web Title: List made: bailment cancellation; The proposal again