शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीला जाऊ विजेच्या गाडीने... पण चाचणी झाल्यावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST

सांगली : पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या मिरज ते लातूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम चाचणीच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत मिरज ते ...

सांगली : पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याशी जोडणाऱ्या मिरज ते लातूर लोहमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम चाचणीच्या प्रतीक्षेत आहे. सद्यस्थितीत मिरज ते कुर्डूवाडीपर्यंतचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, तेथून लातूरपर्यंतचे अंतिम टप्प्यात आहे.

२०११ मध्ये मिरज-पंढरपूर लोहमार्ग ब्रॉडगेज झाल्यानंतर तुलनेने लवकरच म्हणजे पाच-सहा वर्षांतच विद्युतीकरण सुरू झाले. सध्या ढालगाव-सांगोला, सांगोला-पंढरपूर व पंढरपूर ते कुर्डूवाडी या तीन टप्प्यांतील कामे पूर्ण झाली आहेत. त्यांची अंतिम चाचणी मात्र झालेली नाही. केंद्रीय सुरक्षा आयुक्तांकडून ती होणे अपेक्षित आहे. चाचणीअभावी या मार्गावर प्रवासी गाड्या विजेवर पूर्ण क्षमतेने पळविणे शक्य नाही. सध्या काहीवेळा विद्युत इंजिने या मार्गावर नैमित्तिक कामासाठी सोडली जातात. मालगाड्या मात्र डिझेलवरच धावत आहेत. कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या मार्चपासून प्रवासी गाड्या पूर्णत: बंद आहेत. पंधरवड्यापूर्वी कोल्हापूर-धनबाद ही एकमेव गाडी धावली, तीदेखील डिझेलवर सोडण्यात आली होती.

चौकट

दोन वीज उपकेंद्रे

मिरज ते पंढरपूरदरम्यान ढालगाव आणि पंढरपूर येथे वीज उपकेंद्रे आहेत. तेथून गाडीसाठी वीज पुरवली जाईल. कुर्डूवाडी ते लातूरदरम्यान काही ठिकाणी मास्ट पोल व फिटिंग अद्याप अपूर्ण आहे. कुर्डूवाडी यार्ड व उपकेंद्राचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

चौकट

गती व गाड्या वाढतील

मिरज ते लातूरदरम्यान विजेवरील गाड्या सोडण्यास परवानगी मिळाल्यानंतर गाड्यांची गती व संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या ९० ते १०० किलोमीटर प्रतितास या गतीने प्रवासी गाड्या धावतात. ही गती १२० किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढू शकते. त्याशिवाय शटल, एक्सप्रेस, इंटरसिटी व पॅसेंजर गाड्या वाढू शकतात.

चौकट

असा आहे पसारा

मिरज ते ढालगावपर्यंतचे ६३ किलोमीटरचे विद्युतीकरण ६ जानेवारी २०२० रोजी पूर्ण झाले. ढालगाव ते सांगोला (४४.९ किलोमीटर), सांगोला ते पंढरपूर (२९.४ किलोमीटर) व पंढरपूर ते कुर्डूवाडी (५३ किलोमीटर) हे कामदेखील नुकतेच पूर्ण झाले आहे. सुरक्षा आयुक्तांकडून त्यांची चाचणी होणे बाकी आहे. कुर्डूवाडी ते बार्शी (३७ किलोमीटर) व बार्शी ते लातूर (१४९ किलोमीटर) या मार्गाची कामे अद्याप सुरू आहेत.