मायेच्या ओलाव्याने नात्यातील बंध घट्ट करूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:59+5:302021-02-05T07:28:59+5:30

इस्लामपूर : काळ झपाट्याने बदलत असून माणसा-माणसांतील नाती विरळ होत चालली आहेत. नाती टिकायला हवीत. मायेच्या ओलाव्याने नात्यातील बंध ...

Let the moisture of Maya strengthen the bonds in the relationship | मायेच्या ओलाव्याने नात्यातील बंध घट्ट करूया

मायेच्या ओलाव्याने नात्यातील बंध घट्ट करूया

इस्लामपूर : काळ झपाट्याने बदलत असून माणसा-माणसांतील नाती विरळ होत चालली आहेत. नाती टिकायला हवीत. मायेच्या ओलाव्याने नात्यातील बंध अधिक घट्ट करू शकतो, असा विश्वास कवयित्री प्रा. लता ऐवळे यांनी व्यक्त केला.

साखराळे (ता. वाळवा) येथील जवाहर सार्वजनिक वाचनालय व शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘बंध नात्यांचा, गंध कवितेचा’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी माजी सभापती आनंदराव पाटील, वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सूरज चौगुले उपस्थित होते.

यावेळी सुश्रूत जाधव, अदिती कदम यांनी एकपात्री प्रयोग केले. यावेळी प्रगतिशील शेतकरी सचिन पाटील, सयाजी पाटील, विश्वनाथ पाटसुते, वाचनालयाचे कार्यवाह किरण पाटील, खजिनदार विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल कुंभार, बाळासाहेब माने, श्रीकांत पाटील, व्याख्यानमाला संयोजन समितीच्या अध्यक्षा सानिका पवार, उपाध्यक्ष कार्तिक पाटील, प्रतीक पाटील उपस्थित होते.

वैष्णवी जाधव, समीक्षा कुंभार यांनी स्वागत केले. राजकन्या कोळी हिने परिचय करून दिला. सई जाधव, रिया जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्राची जाधव हिने आभार मानले.

फोटो - २८०१२०२१-आयएसएलएम- लता ऐवळे

Web Title: Let the moisture of Maya strengthen the bonds in the relationship