सागावच्या वारणा विद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:50+5:302021-02-05T07:27:50+5:30

पुनवत : सागाव, ता. शिराळा येथील वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये भाषा संवर्धन पंधरवडाअंतर्गत निबंध, हस्ताक्षर, शुद्धलेखन, सामान्यज्ञान, शब्दकोडे, ...

Language fortnight at Sagav's Warna Vidyalaya | सागावच्या वारणा विद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा

सागावच्या वारणा विद्यालयात भाषा संवर्धन पंधरवडा

पुनवत :

सागाव, ता. शिराळा येथील वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये भाषा संवर्धन पंधरवडाअंतर्गत निबंध, हस्ताक्षर, शुद्धलेखन, सामान्यज्ञान, शब्दकोडे, पुस्तक परिचय आणि कविता गायन आदी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक संदीप रोकडे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

यावेळी रोकडे यांचे ‘माय मराठी’ याविषयावर व्याख्यान झाले. यावेळी

विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सदावर्ते, ए. आर. पाटील, ए. बी. साळुंखे, व्ही. डी. पाटील, एस. डी. पाटील, एस. एच. इंगवले, एस. डी. जमदाडे, टी. बी. कुरणे, आर. एम. गावडे, एस. बी. दिवे, एस. एम. पांढरबळे, बी. एम. नलवडे आदी उपस्थित होते.

Web Title: Language fortnight at Sagav's Warna Vidyalaya