शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर बाजाराकडे धान्य व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

By admin | Updated: November 23, 2014 23:46 IST

शेतकऱ्यांचे हाल : खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची मागणी

पांडुरंग डोंगरे - खानापूर --खानापूर आठवडा बाजारात शेतकऱ्यांचा शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी घेत आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब किसान सभेचे भाई अरुण माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवून शेतमालाची खरेदी-विक्री बंद केल्याने शेतकऱ्यांनी शेतीमाल कोणाकडे विकायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे. त्यामुळे शासनाने यात लक्ष घालून खानापूर येथे खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल हमी भावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. हे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यात शेतकऱ्यांची पिळवणूक व फसवणूक होत आहे. किसान सभेचे अध्यक्ष अरुण माने यांनी प्रांताधिकारी सचिन इथापे, जिल्हा पुरवठा अधिकारी गलांडे व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. एस. एन. जाधव यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.यानंतर तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस दिल्याने दोन आठवड्यांपासून धान्य व्यापाऱ्यांनी खानापूर आठवडा बाजारात शेतीमाल खरेदी करणे थांबविले आहे. दोन आठवड्यापासून शेतीमाल विक्रीविना पडून राहिला आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली असली तरी अडचणी व गैरसोय निर्माण झाली आहे. खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व खानापूर येथे बाजार समितीचे धान्य खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. वास्तविक शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात बाजार समिती अस्तित्वात आहे. परंतु, शेतमाल खरेदीचे २५ टक्के व्यवहार बाजार समिती, तर ७५ टक्के व्यवहार खासगी व्यापारी करीत आहेत. यात शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे. खासगी व्यापाऱ्यांना बाजार समितीव्दारेच शेतीमाल खरेदी-विक्री परवाने दिले जातात. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)