Kadaknath hips thrown in front of Mahajanade chariot | Video - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या, स्वाभिमानीचे आंदोलन
Video - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या, स्वाभिमानीचे आंदोलन

ठळक मुद्दे महाजनादेश रथासमोर कडकनाथ कोंबड्या फेकल्यास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

इस्लामपूर - सांगली रस्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश रथासमोर, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी व कडकनाथ प्रकरणातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

मुख्यमंत्री यांच्या रथासमोर अंडी फोडून व कोंबड्या सोडून भाजप सरकारचा जाहीर निषेध केला. स्वाभिमानी पक्षाचे संदीप राजोबा यांना पलुस पोलिस यांनी खबरदारी म्हणून अटक केली.

कुंडलच्या अलीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात्रेत कडकनाथ कोंबड्या सोडून अंडी फेकली. यावेळी भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले.

Web Title: Kadaknath hips thrown in front of Mahajanade chariot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.