शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

गूळ मोदकांना मिळाला नऊ हजारावर दर!

By admin | Updated: December 25, 2014 00:01 IST

रव्यांना मात्र जेमतेमच दर : शेतकऱ्यांचे डोळे कारखान्यांच्या ऊस दराकडे

सहदेव खोत -पुनवत -शिराळा तालुक्यातील कणदूर येथील भगवान शंकर पाटील यांच्या पंचवीस किलोच्या गूळ मोदकांना कऱ्हाडच्या बाजारपेठेत प्रति क्विंटल ९१०० रुपये दर मिळाला. भाटवडेकर यांच्या दुकानात या गुळाचा सौदा नुकताच झाला. दुसरीकडे गूळ रव्यांच्या दरात मात्र फारशी प्रगती नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.शिराळा तालुक्यात उत्पादित गुळाला महिन्याभरात अपेक्षित दर मिळालेला नाही. सध्या तालुक्यात सुमारे ४० गुऱ्हाळघरांतून गुळाचे उत्पादन सुरू आहे. यंदा उसाचा प्रतिटन दर अद्याप ठरला नसल्याने गूळ दरावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या महिन्यात १८०० पासून ते २६००, २००० असा दर मिळाला आहे. गुऱ्हाळभाडे आदणाला २००० रुपयांच्या घरात असल्याने गुऱ्हाळातील गळीत शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ गळिताकडे पाठ फिरवली. कोल्हापूर जिल्ह्यात गुळाच्या हमीभावासाठी आंदोलन होऊनही कऱ्हाड, कोल्हापूर बाजारपेठेत गूळ दरात फारशी वृद्धी झालेली नाही.कणदूर येथील गुऱ्हाळमालक शेतकरी भगवान शंकर पाटील यांनी कऱ्हाड बाजारपेठेत पाठविलेल्या २५ किलोच्या गूळ मोदकांना ९१०० इतका उच्चांकी भाव मिळाला.चांगल्या दर्जाचा गूळ बनविण्यासाठी ९-१० उतारा मिळणारा ऊस लागतो. सध्या गुऱ्हाळात येणाऱ्या उसाचा उतारा ५ ते ७ च्या दरम्यान असल्याने उत्तम प्रतीचा गूळ बनत नसल्याचे अनेक गुऱ्हाळमालकांचे म्हणणे आहे.उत्तम रंग, कणी व चवीचा गूळ बाजारपेठेत आल्यास शेतकऱ्यांना सरासरी ३५०० व त्यापेक्षाही जादा दर मिळणे शक्य आहे. साधारण संक्रांतीनंतर गूळ दरात अपेक्षित वाढ होईल, असे चित्र आहे. - उत्तमराव जाधव, गूळ व्यापारी, कऱ्हाड