शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव म्हणजे मृगजळ दाखविणारे जादूगर

By admin | Updated: September 16, 2015 00:16 IST

विवेक कांबळे : राष्ट्रवादीचा मोर्चा हा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याची टीका

सांगली : पाच वर्षांपूर्वी महाआघाडीच्या रूपाने आ. जयंत पाटील यांनी महापालिकेत प्रवेश केला होता. या काळात त्यांनी कोणती विकासकामे केली, याचा प्रथम उलगडा करावा. ते मृगजळ दाखविणारे जादूगर आहेत, अशी टीका महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. पाणी खासगीकरणावरून राष्ट्रवादीने काढलेला मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला. पालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात मंगळवारी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मोर्चा काढला. याबाबत महापौर कांबळे यांनी राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठविली. ते म्हणाले की, विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणी देण्याचे आश्वासन देत महाआघाडीने दहा कोटींचा चुराडा केला होता. तेच आता रस्त्यावर उतरून खासगीकरण होऊ देणार नाही, असा इशारा देत आहेत. वस्तुत: आम्ही पाण्याचे खासगीकरण केलेले नाही. जयंतराव पंधरा वर्षे सत्तेत होते. त्यातील अकरा वर्षे ते अर्थमंत्री होते. त्यांनी जनतेसाठी कोणता प्रकल्प राबविला, याचे एक तरी उदाहरण द्यावे. सांगलीची जनता त्यांना चांगलीच ओळखून आहे. म्हणून त्यांचे पार्सल इस्लामपूरला परत पाठविले होते. मंत्रालयातील बंद खोलीत ठेकेदारांना कामे वाटण्याचा उद्योग त्यांनी केला. त्यामुळेच तत्कालीन महापौर इद्रिस नायकवडी यांना त्यांच्याविरोधात बंड करावे लागले. त्यांची धोरणे चुकीची होती, म्हणूनच आम्हीही बाहेर पडलो. मंत्री असताना ते कधी रस्त्यावर उतरले होते का? आताचे सांगलीकरांसाठीचे त्यांचे प्रेम पुतनामावशीचे आहे. (प्रतिनिधी)