जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
By संतोष कनमुसे | Updated: October 24, 2025 12:55 IST2025-10-24T12:38:07+5:302025-10-24T12:55:15+5:30
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव अचानक अज्ञातांनी बदलले आहे.

जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कमानीवरील नाव अचानक रात्रीत बदलले. काही अज्ञातांकडून कारखान्याच्या कमानीवर 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे नवीन नाव लिहिले आहे. या कारखान्यावरुन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर आरोप केले होते. आता स्वागत कमानीवरील नाव अचानक बदलल्यामुळे नवीन वाद सुरू झाला आहे.
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली?
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वी पडळकर यांनी जत येथील साखर कारखाना सभासदांना परत करण्याची मागणी केली होती. त्यांनी कारखाना चालू होऊ देणार नसल्याचा इशाराही दिला होता. तर दुसरीकडे, आता अज्ञातांनी रात्रीत कारखान्याच्या कमानीवरील नाव बदलल्याने नवीन वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या कमानीवर आधी राजारामबापू पाटील साखर कारखाना असे नाव होते. या कमानीवरील हे नाव काढून आता राजे विजयसिंह डफळे कारखाना असे लिहिले आहे. राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते ( १९२८-१९४८) आणि त्यांच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना झाली आहे. यात प्रामुख्याने राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा ही समावेश होता. राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना हा कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी उभा केला होता.
राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री बदलल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असा नवीन फलक लावण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.