लाडकी बहीण योजनेला जयंत पाटील यांनी विरोध केला - सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:48 IST2025-11-24T16:47:29+5:302025-11-24T16:48:42+5:30
‘सांगलीत मुक्काम करून आष्टा नगरपरिषद चालवता येत नाही'

लाडकी बहीण योजनेला जयंत पाटील यांनी विरोध केला - सुनील तटकरे
आष्टा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी लाडकी बहीण योजना मांडली, त्याला वैचारिक विरोध करण्याचे काम आमदार जयंत पाटील यांनी केल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली.
आष्टा (ता. वाळवा) येथे रविवारी आयोजित सभेत सुनील तटकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, रणधीर नाईक, प्रवीण माने, डॉ. सतीश बापट, निवास पाटील, संजय बेले, प्रवीण माने, अमोल पडळकर, भगवान ढोले, सयाजी मोरे, लता पडळकर, धैर्यशील मोरे, उदय कुशिरे, पोपट शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, ‘सांगलीत मुक्काम करून आष्टा नगरपरिषद चालवता येत नाही. इथला नगराध्यक्ष आष्ट्यात राहणारा हवा. रात्री बारा वाजता फोन केला तर तो दारात आला पाहिजे. चाळीस वर्षे सत्तेत असताना पेठ-सांगली रस्ता करता आला नाही, अशी लोक येतील, विकास आम्ही करू असे सांगतील.