शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणीपूर्वी निम्मी रक्कम भरणे अनिवार्य

By admin | Updated: March 19, 2015 00:01 IST

वाढीव घरपट्टीचा वाद : अपिलाबाबत इस्लामपूर मुुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

इस्लामपूर : महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील कलम ११९ नुसार शहरातील २००६-०७ पासून १४-१५ पर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या ४ हजार ३४३ मालमत्ताधारकांना कराच्या नोटिसा दिल्या आहेत. शासननिर्णयानुसार ५० टक्के रक्कम भरुन अपील दाखल करावे अथवा सुनावणीपूर्वी ती रक्कम भरणे अनिवार्य आहे, असे आज (बुधवारी) इस्लामपूर पालिकेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी स्पष्ट केले.शहरात पालिकेने दिलेल्या वाढीव घरपट्टीच्या नोटिसांवर वादळ उठलेले असताना मुख्याधिकारी देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची बाजू मांडली. ते म्हणाले की, मुळात करमूल्य ठरवणे, त्याची यादी करणे व त्यानुसार नोटिसा पाठवणे ही प्रशासकीय बाब आहे. त्यामध्ये सत्ताधारी अथवा विरोधी पदाधिकाऱ्यांचा सहभाग असत नाही. नगररचना विभागाचे सहायक संचालक हे कर निर्धारण अधिकारी असतात. त्यांच्याकडूनच हे करमूल्य ठरवले जाते. त्यानंतर आलेल्या नोटिसांवर त्यांच्यासमोर पहिल्या अपिलाची सुनावणी होते. त्यावेळी करमूल्य भरले नाही तरी चालते, मात्र प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीसमोर ज्यावेळी सुनावणी होईल, त्यावेळी करापैकी ५० टक्के रक्कम भरणे बंधनकारक ठरते.ते म्हणाले, ज्या हरकतदारांनी ५० टक्के रक्कम भरली आहे, त्यांची अपिले सुनावणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. शहरात आजअखेर १७ हजार ९१ एकूण मालमत्ता आहेत. त्यापैकी ज्यांनी वापरात बदल, सुधारित बांधकाम, नवीन बांधकाम केले, अशा ४ हजार ३४३ जणांना नोटिसा दिल्या आहेत. जुन्या मालमत्ताधारकांना ही नोटीस दिलेली नाही. मात्र जर नजरचुकीने अशी नोटीस दिली गेली असल्यास त्याची खातरजमा करुन ती रद्द केली जाईल.देशमुख म्हणाले, स्थानिक स्वराज संस्था या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत ही भूमिका असल्याने शासनाने त्यादृष्टीने २०१० नंतर अनेक कायद्यात बदल केले आहेत. भविष्यात मिळणारी अनुदाने ही वसुलीशी निगडित असणार आहेत. त्यामुळेच ६-७ वर्षांत झालेल्या नव्या मालमत्तांवर कर आकारणी झाली पाहिजे. नागरिकांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधून ही प्रक्रिया समजून घेऊन सहकार्य करावे. (वार्ताहर)

नगररचना विभागाकडूनच कर निर्धारण
मुख्याधिकारी नीलेश देशमुख म्हणाले की, शहरातील ज्या हरकतदारांनी ५० टक्के रक्कम भरली आहे, त्यांची अपिले सुनावणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. नगररचना विभागाचे सहायक संचालक हे कर निर्धारण अधिकारी असतात. त्यांच्याकडूनच हे करमूल्य ठरवले जाते. त्यामध्ये सत्ताधारी अथवा विरोधी पदाधिकाऱ्यांचा सहभाग असत नाही. त्यानंतर आलेल्या नोटिसांवर त्यांच्यासमोर पहिल्या अपिलाची सुनावणी होते.