शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात बाजार भाडे वसुलीत भ्रष्टाचार

By admin | Updated: April 3, 2015 23:56 IST

लाखोंच्या गैरव्यवहाराचा संशय : बोगस पावत्यांबाबत चौकशी करण्याची मागणी

अशोक पाटील - इस्लामपूर  शहरात आठवड्यातून रविवार व गुरुवार या दिवशी मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. या बाजाराव्यतिरिक्त सकाळच्या सत्रात जुनी भाजी मंडई येथे, तर दुपारच्या सत्रात मुख्य बाजार कट्ट्यावर बाजार भरत असतो. बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून नगरपालिका जागाभाडे वसूल करते, तर गावातील खोकी, फिरते गाडे आणि रस्त्यावर बसलेले व्यापारी यांच्याकडूनही भाडे वसूल केले जाते. या भाड्यापोटी दिलेल्या पावत्यांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यासाठी चौकशी समिती नेमावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.गुरुवार दि. २ एप्रिल रोजी बाजारासाठी आलेले मलकापूर येथील लसून व्यापारी संतोष बाबू कोंदल यांना सकाळच्या सत्रातील कर्मचाऱ्याने १0 रुपयांच्या १0 पावत्या देऊन १00 रुपये भाडे वसूल केले होते. परंतु दुपारच्या सत्रातील कर्मचाऱ्याने सकाळी दिलेल्या पावत्या परत घेऊन १0 रुपयांच्या ६ पावत्या दिल्या. या पावत्यांवर वेगवेगळ्या तारखा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या प्रकारात गोलमाल असल्याचे स्पष्ट होत आहे, असे आमच्या प्रतिनिधीच्या लक्षात आले. याबाबत नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता सकाळ व सायंकाळच्या सत्रातील भाजी मार्केट आणि शहरातील खोकीधारक, हातगाडे, रस्त्यावर विक्रीस बसणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दिवसाकाठी अडीच हजार रुपये वसूल केले जातात, तर बाजारा दिवशी ४ ते ५ हजार रुपये वसूल होत असल्याचे सांगण्यात आले. वास्तविक शहरातील फक्त खोक्यांची संख्या पाहिली, तर ५00 च्या वर आहे. याचीच रक्कम १0 रुपयांप्रमाणे ५ हजारावर होते. हातगाडे, बाजारात व रस्त्यावर बसणाऱ्या व्यापारी आदींची संख्या पाहता, वसुली केलेले पैसे व पालिकेत जमा होत असलेले पैसे यात मोठी तफावत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.सध्या बाळासाहेब शंकर सूर्यवंशी आणि विष्णू संभाजी माळी हे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी शहरातील हे भाडे वसुलीचे काम पाहतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे कर्मचारी बड्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना मलिद्यासह भाजीपाला घरपोहोच करीत असल्यानेच हा सावळागोंधळ सुरु असल्याची चर्चा व्यापारी वर्गातून आहे. हे कर्मचारी आपली सेवा इमाने इतबारे करीत असल्याने त्यांची इतरत्र कुठल्याही विभागात बदली केली जात नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनीही गेल्या अनेक वर्षांपासून चांगलाच हात धुऊन घेतला आहे.
याबाबत मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, लसूण व्यापारी संतोष बाबू कोंदल यांच्याकडून पावत्यांच्या अदलाबदलीत झालेल्या व्यवहाराची चौकशी करु. यामध्ये जर आमचे कर्मचारी दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

वाहतूक पोलिसांनाही दाद नाही
बाजारादिवशी मसाला, लसूण, कापड, फळे, भाजीपाला विक्रेते टेम्पोतून आपला माल आणतात. तो मुख्य रस्त्याच्या कडेला लावून विक्री करतात. ग्राहक खरेदी करतेवेळी येथे मोठी वाहतुकीची कोंडी होत असते. पालिकेचे कर्मचारी मात्र त्यांच्याकडून पैसे उकळून रस्त्यावर व्यवसाय करण्यास मुभा देतात. यामुळे हे व्यापारी वाहतूक पोलिसांनाही दाद देत नाहीत.

बाजार भाडेपट्टी वसुलीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आहे. त्याच्या चौकशीसाठी नगरसेवकांची समिती गठित करावी. त्या समितीने वर्षातून दोन महिने किती बाजारभाडे जमा होते याचा आकडा काढावा. ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत पदाधिकारी, अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मलिदा खाल्ला आहे, त्याची त्यांच्याकडून वसुली करावी. तसेच त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करावी. अन्यथा या भ्रष्टाचाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू.
- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते