शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुव्हेबल गाळ्यांमधील दलालांची चौकशी

By admin | Updated: June 12, 2015 00:41 IST

महापौरांचे आदेश : गोरगरीब खोकीधारकांसाठीच पुनर्वसनाचे धोरण

सांगली : खोकी पुनर्वसनाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत झालेल्या बैठकीत महापौर विवेक कांबळे यांनी मुव्हेबल गाळ्यांमधील दलालांची चौकशी करण्याचे आदेश दिले. मूळ खोकीधारकांच्या नातेवाईकांशिवाय अन्य कोणाला गाळे दिले असतील तर महापालिका असे गाळे परत घेणार आहे. यापुढे खोकी पुनर्वसन योजना खऱ्या गरजू व गोरगरीब खोकीधारकांसाठीच राबविण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. महापौर कांबळे म्हणाले की, सांगली शहरात सध्या १ हजार ३२४ मुव्हेबल खोकी (बांधीव गाळे) आहेत. तत्कालीन राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्यावेळी सांगलीत जवळपास तीन हजार खोकीधारकांना पुनर्वसनाच्या अटीवर हटविण्यात आले होते. यातील १३२४ खोकीधारकांना मुव्हेबल गाळ्यांचा ताबा देण्यात आला असून आणखी दीड हजार खोकीधारकांना असे गाळे देण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. एसएफसी मॉलच्या विकसकाने किती गाळे बांधून दिले, याबाबतची चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर मुव्हेबल गाळे उभारण्याचे व त्याबाबतचे धोरण निश्चित केले जाईल. महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणचे गाळे हे मूळ खोकीधारकांकडून दलालांनी हडप केले आहेत. मूळ खोकीधारकाचा गाळा किंवा खोके हे त्याच्या नात्यातील लोकांनाच हस्तांतरित केले जाईल. नातेवाईक नसणाऱ्या ज्या लोकांनी हे गाळे हस्तांतरित करून घेतले आहेत, त्यांच्याकडून ते काढून घेतले जातील. अशा सर्व हस्तांतरण प्रकरणांच्या चौकशीचे आदेश सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांना दिलेले आहेत. येत्या सहा दिवसात याबाबतचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर दलालांच्या माध्यमातून झालेले सर्व व्यवहार रद्दबातल ठरविण्यात येतील. त्यांच्या ताब्यातील गाळे महापालिका ताब्यात घेईल. सांगली शहरातील जे अधिकृत खोकीधारक होते, त्यांचे कोणत्याही परिस्थितीत पुनर्वसन करण्यात येईल. जे अनधिकृत होते, त्यांचे पुनर्वसन केले जाणार नाही. दरवर्षी १८00 रुपये इतकेच नाममात्र भाडे या गाळेधारकांकडून घेण्यात येत आहे. इतक्या सुविधा देऊनही जर बेकायदेशीर व्यवहार हस्तांतरणात होत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)