शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: ..त्यापेक्षा नाकर्त्या राज्यकर्त्यांना हाकला, रघुनाथदादा पाटलांचे टीकास्त्र

By अशोक डोंबाळे | Updated: December 3, 2022 18:59 IST

जनतेची लूट करून घरे भरण्याचा उद्योग सुरू आहे. याला कोणताच पक्ष अपवाद दिसत नाही.

सांगली : कर्नाटक, तेलंगणा, गुजरात सीमावर्ती भागातील महाराष्ट्रातीलशेतकरी, पिचलेली जनता शेजारच्या राज्यातील सोई-सुविधा, प्रगती पाहून तिकडे जाण्याची भाषा करत आहे. त्याला इथले आजपर्यंतचे राज्यकर्ते कारणीभूत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी राज्य सोडून जाण्यापेक्षा नाकर्त्या राज्यकर्त्यांना हाकला, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत आज, शनिवारी केली.रघुनाथदादा पाटील म्हणाले, जत पूर्वी भागातील जवळपास ४२ गावे कर्नाटकात जाण्यास तयार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बिलोली ता. तेलंगणा राज्यात सामील करण्याची मागणी आहे. गुजरात शेजारील महाराष्ट्रातील गावेही तिकडे जाण्याची भाषा करत आहेत. हे सर्व का घडतंय?आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांचा भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभार कारणीभूत आहे. खोके आणि फ्रीजच्या खोक्यातून पैशाची भाषा सुरू आहे. जनतेची लूट करून घरे भरण्याचा उद्योग सुरू आहे. याला कोणताच पक्ष अपवाद दिसत नाही. त्यामुळे इथली जनता वैतागली आहे. हे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांसाठी निश्चितच भूषणावह नाही. राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. कर्नाटक, तेलंगणामध्ये १०० टक्के मोफत वीज आणि पाणी मिळत आहे. रस्ते चांगले असून शेतीमालाला दरही चांगला मिळत आहे. गुजरातचे अमूल दूध सर्वाधिक दर देत असून उसाला गुजरातमध्ये प्रति टन ४७०० रुपये, उत्तर प्रदेशात ३९०० रुपये, कर्नाटकात ३६०० रुपये आणि महाराष्ट्रातील साखर कारखाने ३०५० रुपये दर देत आहेत. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे धोरण शेतकरीविरोधी असल्यामुळेच शेतकरी, कष्टकऱ्यांना महाराष्ट्रात राहावे असे वाटत नाही, ही गंभीर बाब आहे. यातून तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडा घेऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

राज्यकर्त्यांनीच शासकीय दूध डेअरी बंद पाडलीमहाराष्ट्रातील दूध संघ चालकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी शासकीय दूध डेअरी बंद पाडण्याचे पाप केले आहे. एकही शासकीय संस्था राज्यकर्त्यांनी चांगली चालविली नसल्यामुळेच महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. गुजरातचे अमूल दूध देशात नंबर एकवर गेले असताना महाराष्ट्रातील शासकीय डेअरीला कुलूप कसे लागते ? असा संतप्त सवालही रघुनाथदादांनी उपस्थित केला. सहकारी साखर कारखानेही बंद पाडून खासगी कंपन्यांच्या घशात घातले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दूध संघाकडून आठ हजार कोटींचा गैरव्यवहारदूध उत्पादकांना प्रति लिटर २५ रुपये दूध दर देण्यासाठी राज्य सरकारने प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान दूध संघ चालकांना दिले होते. दि. १९ जून २०१७ ते दि. २७ सप्टेंबर २०१८ या कालावधीत शेतकऱ्यांच्या दुधातील रकमेत आठ हजार कोटींचा दूध संघ चालकांनी गैरव्यवहार केला आहे, असा आरोप रघुनाथदादांनी केला. या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी तत्कालीन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सुनील केदार आणि सध्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. या एकाही मंत्र्याने चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकFarmerशेतकरी