केंद्रीय आरोग्य पथकाकडून वाळवा तालुक्यात तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:34+5:302021-04-11T04:26:34+5:30

कामेरी : केंद्रीय आरोग्य पथकाने वाळवा तालुक्यात येडेनिपाणी, येलूर व इस्लामपूरला भेट दिली. दत्त टेकडी येथील कोविड केअर सेंटर, ...

Inspection in Valva taluka by Central Health Squad | केंद्रीय आरोग्य पथकाकडून वाळवा तालुक्यात तपासणी

केंद्रीय आरोग्य पथकाकडून वाळवा तालुक्यात तपासणी

कामेरी : केंद्रीय आरोग्य पथकाने वाळवा तालुक्यात येडेनिपाणी, येलूर व इस्लामपूरला भेट दिली. दत्त टेकडी येथील कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा, येडेनिपाणी उपकेंद्रातील लसीकरण केंद्र व येलूर येथील कंटेन्मेंट झोनची पाहणी केली.

डॉ. पवनकुमार शर्मा यांच्या पथकाने शनिवारी वाळवा तालुक्यात भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, डॉ. संतोष पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील उपस्थित हाेते. येडेनिपाणी येथे काेराेना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतीने सुरू आहे. आठवड्यात १५३५ नागरिकांना लसीकरण करून जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रांत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाने या केंद्राचे काैतुक केले. येडेनिपाणीत लोकप्रतिनिधी व राजकीय नेतेमंडळींनी संघटितपणे केलेल्या जनजागृतीमुळे व त्याला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हे शक्य झाले. सध्या येथील ४५ च्या पुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण अंतिम टप्प्यात आहे.

वाळवा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील, कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ अंकोलीकर, सर्व आरोग्य कर्मचारी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

फोटो : १० कामेरी १

ओळ : येलूर (ता. वाळवा) येथील कंटेन्मेंट झोनची पाहणी डॉ. पवनकुमार शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, डॉ. संतोष पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी केली.

Web Title: Inspection in Valva taluka by Central Health Squad