शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेची चौकशी करा, पण बदनामी नको

By admin | Updated: September 21, 2015 00:07 IST

सुधीर गाडगीळांच्या आरोपाने खळबळ : घोटाळे सिद्ध न झाल्यास राजीनामा देण्याची मागणी

सांगली : सांगली महापालिकेत पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याच्या, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या आरोपबॉम्बने शहरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीप्रणित विकास महाआघाडीच्या कारभारावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. खरंच, पालिकेत घोटाळे झाले असतील, तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई व्हावी, पण केवळ राजकीय विरोधातून महापालिकेची बदनामी नको, अशी प्रतिक्रियाही सर्वच स्तरातून उमटत आहे. सत्ताधारी काँग्रेसने तर गाडगीळांनाच कात्रीत धरण्याची तयारी चालविली आहे. घरकुल, पाणीपुरवठासह एचसीएल व इतर योजनांचा निधी महाआघाडीच्या काळात खर्च झाला आहे. त्यामुळे ज्या महाआघाडीने त्यांना विधानसभेवेळी मदत केली, तीच अडचणीत येत असेल, तर काँग्रेसने या संधीचा फायदा घेण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षात ड्रेनेजमधील आराखडाबाह्य कामे वगळता, काँग्रेसवर फार मोठे आरोप झालेले नाहीत. पाणी खासगीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर असला तरी, त्याचा ठरावही महाआघाडीच्या काळातच झाला आहे. तेव्हा या घोटाळ्याची पारदर्शी चौकशी व्हावी, अशीच अपेक्षा काँग्रेस करीत आहे. (प्रतिनिधी) भाजपचे नगरसेवक काय करीत होते?महापालिकेत पाचशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केला आहे. विकास महाआघाडीच्या तीन व काँग्रेसच्या गेल्या दोन वर्षातील कारभाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. महाआघाडीच्या सत्तेत भाजपही सहभागी होता. या सत्तेत सलग पाच वर्षे भाजपकडेच उपमहापौरपद होते, तर त्यांच्याच ज्येष्ठ नगरसेवकाला स्थायी समिती सभापतीपदही दिले होते. आताच्या काँग्रेस सत्ताकाळातही भाजपचे संख्याबळ सहा ते सातच्या घरात आहे. मग घोटाळे होत असताना या नगरसेवकांनी कधी तोंड का उघडले नाही?, असा सवाल उपमहापौर प्रशांत पाटील यांनी उपस्थित केला.