शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपेक्समधील गैरप्रकारांची रुग्णांच्या नातेवाइकांकडून माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST

रुग्णालयचालक डॉ. महेश जाधव याचे भाऊ मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ मदन जाधव व रुग्णालयातील तंत्रज्ञ बसवराज कांबळे या ...

रुग्णालयचालक डॉ. महेश जाधव याचे भाऊ मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ मदन जाधव व रुग्णालयातील तंत्रज्ञ बसवराज कांबळे या दोघांची पोलीस कोठडी संपत असल्याने सोमवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यांत येणार आहे. मिरजेतील अ‍ॅपेक्स रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयचालक डाॅ. जाधव याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. जाधव बंधूसह दहा जणांना अटक केली आहे.

अ‍ॅपेक्सप्रकरणी डाॅ. जाधव याचे भाऊ सांगलीतील मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मदन जाधव व इसीजी तंत्रज्ञ बसवराज कांबळे यांनी डॉ. महेश जाधव यास मृत रुग्णांच्या खोट्या उपचाराची कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत केल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अटक केलेल्या डाॅ. मदन जाधव व कांबळे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यांत येणार आहे. अ‍ॅपेक्सप्रकरणी आणखी दोन डाॅक्टरांना पोलीस ठाण्यात पाचारण करून त्यांची चाैकशी करण्यात आली आहे. पोलिसांच्या अटकसत्रामुळे सांगली मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

चाैकट

अ‍ॅपेक्स रुग्णालयास नियमबाह्य परवाना देण्यात आल्याचे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी नाकारले आहे. महापालिकेने नियमानुसार पडताळणी करूनच अ‍ॅपेक्सला परवानगी दिल्याचा त्यांनी दावा केला. याप्रकरणी गुन्ह्याचा तपास पोलीस उत्तम करीत आहेत. महापालिकेने ॲपेक्स रुग्णालयास एका कागदावर परवानगी दिलेली नाही. काही लोकांनी माहिती अधिकार अंतर्गत केवळ एकच कागद मिळवून त्याआधारे दावा करीत आहेत. मात्र मी स्वतः रुग्णालयाची फाइल तपासली आहे. महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी परवानगी देताना रुग्णालयाकडून सर्व माहिती प्राप्त केली होती. यामुळे एका कागदाच्या आधारे महापालिकेने या रुग्णालयास परवानगी दिली असे होत नसल्याचेही आयुक्त कापडणीस यांनी स्पष्ट केले.