शिरढोण येथे किसान सभेचे बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:44+5:302021-03-05T04:25:44+5:30

शिरढोण : अखिल भारतीय किसान सभेतर्फे रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिरढोण, ता. कवठेमहांकाळ येथे ...

Indefinite holding of Kisan Sabha at Shirdhon | शिरढोण येथे किसान सभेचे बेमुदत धरणे

शिरढोण येथे किसान सभेचे बेमुदत धरणे

शिरढोण :

अखिल भारतीय किसान सभेतर्फे रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिरढोण, ता. कवठेमहांकाळ येथे गुरुवारपासून शेतकऱ्यांनी बेेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दीड वर्षांपूर्वी झालेल्या फेरसर्व्हेच्या निवाडा नोटीस तातडीने द्या. शिरढोण येथे महामार्गासाठी अतिरिक्त क्षेत्र बाधित होत असल्याने त्यामध्ये घरे, फळझाडे, बोअरवेल बाधित होत आहेत. यासंबंधी प्रांताधिकारी मिरज यांना डिसेंबर २०२० पासून सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या सर्व्हेमध्ये अतिरिक्त क्षेत्राबाबत वर्षांपूर्वी राजपत्र झाले असताना अद्याप निवाडा नोटीस मिळाल्या नाहीत. शिरढोण येथील बाधित क्षेत्राची निवाडा नोटीस त्वरित शेतकऱ्यांना द्या, २०१३ भूमिअधिग्रहण कायद्याप्रमाणे नुकसानभरपाईची निवाडा नोटीस न देता शेतकऱ्यांच्या हद्दीत कसलेही काम सुरू करता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत निवाडा नोटीस मिळणार नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन स्थगित न करण्याचा निर्णय संबंधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. महामार्गाचे कसलेही काम संबंधित गटात करू नये, अशी मागणीदेखील किसान सभेच्या वतीने कॉम्रेड दिगंबर कांबळे यांनी केली आहे.

यावेळी शाहू विचारमंचचे अध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे, किसान सभेचे सागर पाटील, बाळासाहेब पाटील, अमित पाटील, नितीन पाटील, मच्छिंद्र पाटील कुची, प्रकाश पाटील, मच्छिंद्र पाटील, रजनीकांत पाटील, रावसाहेब पाटील, गोरख सूर्यवंशी, सुनील करगणे, विनायक सूर्यवंशी, लक्ष्मण चौगुले व इतर महामार्ग बाधित शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Indefinite holding of Kisan Sabha at Shirdhon