संखमधील शिक्षकांच्या वेतनासाठी बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:16+5:302021-02-05T07:25:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संख (ता. जत) येथील गुरुबसव विद्यालयाच्या शिक्षकांनी वेतनासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. ...

Indefinite fast for teachers' salaries in Sankh | संखमधील शिक्षकांच्या वेतनासाठी बेमुदत उपोषण

संखमधील शिक्षकांच्या वेतनासाठी बेमुदत उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : संख (ता. जत) येथील गुरुबसव विद्यालयाच्या शिक्षकांनी वेतनासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. ते मागे घेण्यासाठी प्रशासनाचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.

प्रहार शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले. संघटनेचे राज्याध्यक्ष सचिन नागटिळक यांच्यासह शिक्षक शिवानंद धन्याळ, काशीनाथ नलावडे, सुभाषचंद्र बिराजदार, मल्लिकार्जुन बिराजदार, अप्पासाहेब बिराजदार, श्रीशैल्य माळी, चनबसू बगली, मल्लाप्पा कराडे, संजीव बजंत्री, शंकर शिंदे, अप्पा पाटील हे शिक्षक उपोषणाला बसले आहेत. त्यांनी सांगितले की, ऑगस्टपासून वेतन मिळालेले नाही. पाच जणांचे अर्धवट वेतन काढले, त्यातील फरकाची रक्कम मिळालेली नाही. पगार बिल व सेवापुस्तिकेची प्रत मिळावी. वेतनाअभावी शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

दरम्यान, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी नामदेव माळी, उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. शुक्रवारी शाळेत येऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले; पण आंदोलक ठाम राहिले. रात्री उशिरा आंदोलकांच्या प्रतिनिधींशी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी चर्चा केली.

------

Web Title: Indefinite fast for teachers' salaries in Sankh