शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
5
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
6
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
7
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
8
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
9
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
10
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
11
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
12
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
13
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
14
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
15
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
16
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
17
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
18
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
19
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
20
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
Daily Top 2Weekly Top 5

विटा शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटेकरांना नागरी सुविधा देण्यात कोणतीही कुचराई करू नये. नागरीकांची एकही तक्रार आमच्यापर्यंत यायला नको ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : विटेकरांना नागरी सुविधा देण्यात कोणतीही कुचराई करू नये. नागरीकांची एकही तक्रार आमच्यापर्यंत यायला नको याची दक्षता घ्या, असे सांगून विटा शहरात अनियमीत व पुरेसा पाणीपुरवठा होत नसेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत संपूर्ण पाईपची गळती काढून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरातील मुल्ला गल्ली येथील महिलांनी पाण्यासाठी थेट विटा नगरपरिषदेत जाऊन संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पालिकेत पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेतली. बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांनी खडेबोल सुनावले.

वैभव पाटील म्हणाले, शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणे हे नगरपालिकेचे कर्तव्यच आहे. त्याचे संबंधित विभागाकडून पालन होताना दिसत नाही. जर कोणी आपल्या कामात चूक केली किंवा हलगर्जीपणा केल्यास त्याची गय केली जाणार नाही. घोगाववरून विटा शहराला पाणीपुरवठा होत आहे. त्याठिकाणी वीज अथवा पंपांचा काही घोटाळा झाला तरच एखादा दुसरा दिवस पाणी मागे-पुढे होऊ शकते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा, विटा शहराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, असेही माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले. यावेळी नगरसेवक फिरोज तांबोळी, राहुल हजारे, संजय सपकाळ, अ‍ॅड. धर्मेश पाटील, प्रशांत कांबळे, विनोद पाटील, भरत कांबळे, राजेंद्र जिरमे, आप्पा पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.