शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छता दिसल्यास खाते प्रमुखांवर कारवाई करणार

By admin | Updated: November 18, 2014 23:27 IST

अंजली मरोड : दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वॉच

विटा : स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून, १४ सरकारी विभागांची कार्यालये असलेल्या येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आता अस्वच्छता दिसल्यास थेट खातेप्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून स्वच्छतेबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पान, तंबाखू व गुटखा खाऊन प्रशासकीय इमारतीचे कोपरे रंगविणाऱ्या नागरिकांवर आता इमारतीत बसविण्यात आलेल्या दहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे.संपूर्ण देशभर स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून विटा येथील टोलेजंग मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या इमारतीत १४ शासकीय विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे नागरिकांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. या इमारतीचे सर्वच कोपरे पान, तंबाखू, गुटखा, मावा खाणाऱ्या नागरिकांनी रंगवून टाकले होते. त्यामुळे इमारतीत अत्यंत दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते.या पार्श्वभूमीवर विट्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी अंजली मरोड, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत महाजन, महादेव पाटील यांच्यासह तहसील, कृषी, सामाजिक वनीकरण, वजन-मापे, उपविभागीय कृषी, सहायक निबंधक, दुय्यम निबंधक, उत्पादन शुल्क या विविध विभागांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी कार्यालयाच्या आवारातील कचरा बाहेर काढून नागरिकांनी पान, तंबाखू खाऊन रंगविलेल्या भिंतींचे कोपरे स्वच्छ करण्यात आले.दरम्यान, आता यापुढील काळात इमारतीतील आवारात कचरा व अस्वच्छता दिसल्यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार मरोड यांनी सांगितले. (वार्ताहर)नागरिकांवर दंडात्मक कारवाईइमारतीत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी इमारतीच्या आवारात दहा सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रशासकीय कार्यालयात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आता चकाचक दिसू लागली आहे.इमारतीचे सर्वच कोपरे पान, तंबाखू, गुटखा, मावा खाणाऱ्या नागरिकांनी रंगवून टाकले होते. ते कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केले.