Sangli: मित्राच्या दुचाकीच्या हप्त्यासाठी रचला कट; कोयत्याचा धाक दाखवत हॉटेल चालकास लूटले, चौघे विद्यार्थी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:56 IST2026-02-11T15:56:34+5:302026-02-11T15:56:54+5:30

संबंधित धाब्याची पूर्वतयारी म्हणून रेकीही करण्यात आली होती

Hotel owner robbed by threatening to kill in Miraj Four students arrested | Sangli: मित्राच्या दुचाकीच्या हप्त्यासाठी रचला कट; कोयत्याचा धाक दाखवत हॉटेल चालकास लूटले, चौघे विद्यार्थी जेरबंद

Sangli: मित्राच्या दुचाकीच्या हप्त्यासाठी रचला कट; कोयत्याचा धाक दाखवत हॉटेल चालकास लूटले, चौघे विद्यार्थी जेरबंद

मिरज : मिरज- म्हैसाळ रस्त्यावरील ‘हॉटेल टर्निंग पॉइंट’ येथे कोयता व विळ्याचा धाक दाखवत हॉटेल मालकाच्या वडिलांवर हल्ला करून १२ हजार रुपये रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे, मित्राच्या दुचाकीचा फायनान्सचा हप्ता भरण्यासाठी चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत प्रथमेश राजेंद्र पाटील (वय २६, व्यवसाय- हॉटेल, रा. सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. जबरी चोरीप्रकरणी दाऊद नईम सलाती (वय २०, रा. गुरुवार पेठ, मिरज), आयान फारुक जमादार (वय २०, रा. गुरुवार पेठ, मिरज), अकीबअली अकबरअली पठाण (वय २०, रा. लक्ष्मी मार्केट, मिरज) व सलीम अब्दुल भोकरे (वय २१, रा. बोलवाड रोड, मिरज) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना दि.४ रोजी रात्री ११:०० वाजता घडली. आरोपी आयान जमादार व अकीबअली पठाण यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पाटील यांचे वडील दिवसभराचा हिशोब करीत असताना आरोपींनी त्यांना विळ्याने मारहाण केली व जबरदस्तीने १२ हजार ३०० रुपये रोख रक्कम घेऊन पळ काढला.

तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या २४ तासांत चारही आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात वापरलेला कोयता, विळा व दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

अटक करण्यात आलेले चौघे अभियांत्रिकी, बीसीए, डीएमएलटी व बारावीचे शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी असून, मित्राच्या दुचाकीच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी शहराबाहेरील धाब्यावर लूटमार करण्याचा कट रचला होता. यासाठी संबंधित धाब्याची पूर्वतयारी म्हणून रेकीही करण्यात आली होती. पुढील तपास मिरज शहर पोलिस करीत आहेत.

Web Title : सांगली: दोस्त की बाइक की किस्त के लिए छात्रों ने होटल लूटा; गिरफ्तार

Web Summary : सांगली के मिराज में चार कॉलेज छात्रों ने दोस्त की बाइक की किस्त भरने के लिए एक होटल को लूटा। उन्होंने मालिक के पिता पर हमला किया और 12,000 रुपये चुरा लिए। पुलिस ने 24 घंटे के भीतर उन्हें गिरफ्तार कर लिया, हथियार और बाइक बरामद की। छात्रों ने होटल की रेकी करने के बाद लूट की योजना बनाई।

Web Title : Sangli: Students Rob Hotel for Friend's Bike Installment; Arrested

Web Summary : Four college students robbed a hotel in Miraj to pay a friend's bike installment. They attacked the owner's father, stealing ₹12,000. Police arrested them within 24 hours, recovering weapons and bikes. The students planned the robbery after surveying the hotel.