शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

HSC 12th Result 2022: सांगली जिल्ह्यात मुलींचेच वर्चस्व, ९३.९१ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:54 IST

सर्व शाखांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास मुलींचाच टक्का जास्त आहे.

सांगली : बारावी परीक्षेच्या निकालात जिल्ह्यात मुलींचाच वरचष्मा पाहायला मिळाला. जिल्ह्यातून विविध शाखांचे ३३ हजार २०१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३१ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी ९३.९१ आहे. यात उत्तीर्णमध्ये मुली ९६.५१ टक्के, तर मुले ९१.७४ टक्के आहेत. मुलींची आकडेवारी ४.७७ टक्क्यांनी अधिक आहे. आज, बुधवारी बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे.सांगली जिल्ह्यातून विज्ञान शाखेच्या १६ हजार ६४० विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ९८.५८ टक्के आहे. कला शाखेच्या नऊ हजार ५२६ विद्यार्थ्यांपैकी आठ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्यांची टक्केवारी ८७.९४ इतकी आहे. वाणिज्य शाखेच्या पाच हजार ४२१ विद्यार्थ्यांपैकी चार हजार ८९९ विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.३७ आहे. व्यावसायिक शाखेसाठी एक हजार ६०६ विद्यार्थी बसले होते, पैकी एक हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सर्व शाखांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास मुलींचाच टक्का जास्त आहे. जिल्ह्यातील १८ हजार ९१ मुले परीक्षेस बसले होते. त्यापैकी १६ हजार ५९७ मुले उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ९१.७४ आहे. १५ हजार ११० मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी १४ हजार ५८३ उत्तीर्ण झाल्या आहेत. यात ९६.५१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.७७ टक्क्यांनी जास्त आहे.

शाखा निकालाची टक्केवारीविज्ञान        ९८.५८कला         ८७.९४वाणिज्य      ९०.३७व्यावसायिक  ९२.८३

टॅग्स :SangliसांगलीHSC Exam Resultबारावी निकाल