इस्लामपुरात श्री गोमटेश पतसंस्थेने सीसी टीव्ही कॅमेऱ्यासाठी आर्थिक मदतीचा धनादेश पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संचालक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या सुरक्षतेच्या दृष्टीने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सामाजिक उपक्रमात सहभाग म्हणून श्री गोमटेश पतसंस्थेने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आर्थिक मदतीचा धनादेश पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी अध्यक्ष उदय देसाई, उपाध्यक्ष शीतल राजमाने, राजेंद्र ढबू, संजय कबुरे, सुभाष राजमाने, सुरेश कबुरे, महावीर साधू, राजेंद्र ढबू, किरण शेटे, सुनील पाटील, महेंद्र पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते.