Sangli: चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी, धरणातून विसर्ग वाढवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:48 IST2025-07-25T18:47:27+5:302025-07-25T18:48:30+5:30
पुन्हा शेतीची कामे खोळंबली

Sangli: चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी, धरणातून विसर्ग वाढवला
शिराळा : शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र गेल्या चोवीस तासात पाथरपुंज येथे १२०, निवळे ६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणातून ५४०० ऐवजी ६७६० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.
वक्र द्वाराद्वारे ५१३० व विद्युतगृहातून १६३० असा एकूण ६७६० क्युसेक विसर्ग सुरु आहे. गतवर्षी चांदोली येथे २१२४ मी.मी.पाऊस झाला होता.आज अखेर १८०९ मी.मी.पाऊस झाला आहे. धरणात २८.११ टी.एम.सी पाणीसाठा झाला आहे. धरणात ९४४३ क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तालुक्यात हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा शेतीची कामे खोळंबली आहेत.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाची नोंद मिलिमीटर मध्ये
पाथरपुंज - १२० मिमी (३७७२)
निवळे - ६६ (३१४२)
धनगरवाडा - ५३ (१९००)
चांदोली - २७ (१८१४)