शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत इंधन चोरट्यांचा धुमाकूळ; सुरक्षेला आव्हान

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

काटेरी कुंपण उभारणार : इंधन डेपो असुरक्षित; नागरी वस्ती वाढल्याने धोका अधिक

मिरज : पाच जिल्ह्यांना इंधन पुरवठा करणारा मिरजेतील इंधन डेपो चोरट्यांच्या उपद्रवामुळे व सभोवतालच्या नागरी वस्तीमुळे असुरक्षित बनला आहे. इंधन चोरट्यांचा उपद्रव थांबत नसल्याने त्रस्त झालेल्या इंधन कंपन्यांतर्फे इंधन डेपोसमोर रेल्वे मार्गाला काटेरी कुंपण उभारण्यात येणार आहे.इंडियन आॅईल व भारत पेट्रोलियम कंपनीचे मिरजेत रेल्वे स्थानकालगत इंधन डेपो आहेत. रेल्वे टँकरमधून आलेल्या पेट्रोल, डिझेल व रॉकेल या इंधनाचा मिरजेच्या या डेपोत साठा करून, त्याचा सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना पुरवठा करण्यात येतो. या इंधन डेपोतील मोठ्या टाक्यांमध्ये कोट्यवधी लिटर पेट्रोल व डिझेलचा साठा करण्यात येतो. सुरक्षेच्यादृष्टीने इंधन डेपो शहरापासून दूर असले पाहिजेत. मात्र मिरजेतील इंधन डेपोभोवती गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात इमारती व वसाहती वाढल्या आहेत. रहिवासी इमारतींसह रुग्णालये, लॉज व बिअरबार अगदी डेपोच्या कुंपणालगतच असल्याने इंधन डेपोच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. डेपोलगत नागरी वसाहत वाढत असल्याने मिरजेतील या दोन्ही कंपन्यांचे डेपो भिलवडीजवळ हजारवाडी येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने डेपो स्थलांतर रखडल्याची माहिती मिळाली. इंधन डेपोच्या सुरक्षेसाठी डेपोजवळून जाणारा रस्ता खासगी वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय काही वर्षापूर्वी घेण्यात आला होता. मात्र त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. दररोज रेल्वे टँकरमधील लाखो लिटर पेट्रोल व डिझेल डेपोतील टाक्यांमध्ये उतरविताना इंधन चोऱ्या सुरू आहेत. गेल्या काही वर्षात इंधन चोरी करणाऱ्या टोळ्यांना रोखण्यासाठी पेट्रोल टँकरला सील व इतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रेल्वे टँकरमधून इंधन काढून डेपोतील टाकीत भरण्याचे काम खासगी ठेकेदारांकडे आहे. या खासगी ठेकेदारांच्या संगनमताने दररोज पेट्रोल व डिझेल चोऱ्या सुरु आहेत. मोठ्या कॅनमधून भर दिवसा रिक्षा व व्हॅनमधून चोरट्या इंधनाची वाहतूक सुरु आहे. रेल्वे स्थानकालगत झोपडपट्टी, झारीबाग झोपडपट्टीत अशा चोरट्या इंधनाचे साठे करण्यात येत असल्याने अवैध इंधन साठ्याचा झोपडपट्टीवासीयांना धोका निर्माण झाला आहे. चोरलेले पेट्रोल व डिझेल ६० व ५० रुपये प्रति लिटर दराने विक्री करण्यात येते. रेल्वे सुरक्षा दल व पोलीस यंत्रणा असतानाही होणाऱ्या इंधन चोऱ्यामुळे इंधन डेपोतील अधिकारी त्रस्त आहेत. चोऱ्यांमुळे इंधन कंपन्यांचे लाखो रुपये नुकसान होत आहे. डेपोलगत होणाऱ्या अवैध इंधन साठ्यामुळे इंधन डेपो परिसर धोकादायक बनला आहे. (वार्ताहर)बांधकामे जोरातइंधन डेपोजवळ मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. इंधन कंपन्यांची डेपो परिसरातील बांधकामे थांबविण्याची मागणी होत आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाकडून मोठ्या प्रमाणात बांधकामांना परवानगी देण्यात येत आहे. इंधन चोऱ्या थांबविण्यासाठी डेपोसमोरील रेल्वे यार्डात रेल्वे रूळांना दोन्ही बाजूने कुंपण घालण्याची तयारी सुरू आहे.