शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

तासासाठी आले अन् बदनामी करून गेले!

By admin | Updated: September 17, 2014 23:04 IST

उपनिरीक्षकाची करामत : आटपाडी पोलिसात अस्वस्थता

आटपाडी : कर्तव्यात कसूर, असभ्य वर्तन आणि सतत दारू पिऊन ड्युटीवर येणारे पोलीस उपनिरीक्षक हरी काळे यांना नुकतेच जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस आणि जनतेत योग्य तो संदेश गेला असला तरी, आटपाडी पोलिसांची मात्र पंचाईत झाली आहे. कारण एक तास आटपाडी पोलीस ठाण्यात आला आणि आटपाडी पोलीस ठाण्याची बदनामी करून गेला, अशी खंत पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.उपनिरीक्षक काळे यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. त्यानंतर त्यांची पोलीस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. ते नेहमी दारू पिऊन ड्युटीवर येत असत. दोन-तीन वेळा ताकीद देऊनही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नव्हती. म्हणून दि. ४ जुलै रोजी त्यांची आटपाडी पोलीस ठाण्याकडे बदली करण्यात आली. मात्र काळे आटपाडी पोलीस ठाण्यात हजर होताच पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांनी चांदोली धरणाच्या बंदोबस्तासाठी त्यांची रवानगी केली. त्यानंतर ते कधीही आटपाडी पोलीस ठाण्यात आले नाहीत. याची चर्चा कर्मचाऱ्यात सुरू होती. सोमवारी (दि. १५ सप्टेंबर) जिल्हा पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक काळे यांच्यावरील कारवाईची चर्चा झाली. त्यामध्ये अशा कर्मचाऱ्यांमुळे आटपाडी पोलिसांची नाहक बदनामी होत आहे. अशी खंत कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)आटपाडी म्हणजे शिक्षा नव्हे... कोणत्याही विभागातील वादग्रस्त कर्मचाऱ्याला शिक्षा म्हणून आटपाडीला पाठविण्यात येते. पण या बहाद्दरांमध्ये सुधारणा होण्याऐवजी त्यांच्या परिस्थितीतच आणखी सुधारणा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. याचे कारण म्हणजे आटपाडीतल्या सगळ्याच विभागांच्या कार्यालयांमध्ये अशा वादग्रस्त कर्मचाऱ्यांचेच बहुमत होत असल्याने, एकमेकांच्या युक्त्यांची देवाण-घेवाण करून ही मंडळी स्वत:मध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्था बिघडवत आहेत. त्यामुळेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला जिल्ह्यात सर्वाधिक यश आटपाडीतील सापळ्यांना मिळत आहे.