शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हमाल, तोलाईदारांचा सांगलीत मोर्चा

By admin | Updated: December 19, 2014 23:52 IST

बाजार समितीला निवेदन : तोलाई मजुरी देण्याची मागणी

सांगली : इलेक्ट्रॉनिक वजन-काट्यावर शेतीमालाचे वजन केल्यास त्यास तोलाई मजुरी आकारू नये, असा पणन महामंडळाचा आदेश सर्व बाजार समित्यांना आला आहे. याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) हमाल तोलाईदारांच्यावतीने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, विकास मगदूम यांनी केले.याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडे इलेक्ट्रॉनिक वजन-काटे ताबडतोब बसवावेत आणि वजन-काट्यावर वजन केलेल्या शेतीमालाची तोलाई कपात करण्यात येऊ नये, असे आदेश पणन खात्याने काढले आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये विविध घटकांत चर्चा सुरु असून तोलणाऱ्या घटकांत अस्वस्थता व असंतोष आहे. हा निर्णय घेण्याआधी आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करणे आवश्यक होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात गेल्या चार वर्षांपासून शंभर टक्के इलेक्ट्रॉनिक काट्यावरच शेतीमालाचे वजन केले जात असून, तोलाई मजुरी दिली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांची तक्रार नाही. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना घेऊनच बाजार समिती तोलाई मजुरी ठरवत आहे. आता नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार असून, तोलाईदार, हमाल यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.मोर्चाची सुरुवात हमाल पंचायत कार्यालयापासून करण्यात आली. यावेळी शासनाच्या नव्या आदेशाची होळी करण्यात आली. आंदोलनामध्ये बाळासाहेब बंडगर, अ‍ॅड. के. डी. शिंदे, बजरंग मोहिते, श्रीकांत पुस्तके, यशवंत पवार, वसंत सूर्यवंशी, यशवंत सावंत, गोविंद सावंत आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)