शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कवठेएकंदमध्ये विशेष पथकाकडून झाडाझडती

By admin | Updated: May 7, 2015 00:31 IST

पोलीस अधिकाऱ्यांचा ठिय्या : मंडळे, परवानाधारकांची तपासणी

तासगाव : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे फटाके तयार करताना ईगल फायर वर्क्समध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. दोन विशेष पोलीस पथकांच्या माध्यमातून बुधवारी दिवसभर गावात झाडाझडती घेण्यात आली. दारू शोभा मंडळे, परवानाधारक व्यावसायिकांसह काही संशयास्पद ठिकाणांची तपासणी करण्यात आली. गावात दिवसभर पोलीस आणि अधिकाऱ्यांचा ठिय्या होता.कवठेएकंद येथील ईगल फायर वर्क्समध्ये फटाके तयार करताना झालेल्या भीषण स्फोटात अकरा जणांचा भाजून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून गावातील वातावरण सुन्न आहे. या घटनेनंतर या फटाक्यांच्या कारखान्याचे मालक रामचंद्र गुरव यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियम व अटींचे पालन न करता फटाक्यांची निर्मिती होत असल्यामुळेच असे अपघात होऊन लोकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी कवठेएकंदमध्ये पोलीस निरीक्षक ए. के. चोरमुले आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक शहाणे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करुन विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. दसरा उत्सवाच्यावेळी फटाके तयार करणारी शोभा मंडळे, परवानाधारक व्यावसायिक यांच्या कारखान्यांची कसून तपासणी करण्यात आली. दारुचा साठा आणि इतर कायदेशीर बाबींचीही तपासणी करण्यात आली. गावात दिवसभर तपासणी मोहीम सुरु होती. ४० हून अधिक ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, तासगावचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक रमेश बनकर दिवसभर गावात ठाण मांडून होते. (वार्ताहर)पतंगराव कदम यांची घटनास्थळी भेटकवठेएकंद येथील भीषण स्फोटानंतर गेले दोन दिवस वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, नेतेमंडळींची येथे वर्दळ वाढली आहे. बुधवारी माजी मंत्री आणि आमदार पतंगराव कदम यांनी घटनास्थळी पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्फोट झालेल्या ईगल फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्याचे मालक रामचंद्र गुरव यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.