कोरोनाशी लढा देणाऱ्या परिचारिकांची शासनाने योग्य दखल घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:21+5:302021-02-05T07:25:21+5:30

सांगलीत शासकीय रुग्णालयात नर्सिंग फेडरेशनच्या वर्धापनदिनी परिचारिकांचा कोरोनायोद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर नणंदकर, हाशमत हावेरी, प्रकाश ...

The government should take proper notice of the nurses who are fighting with Corona | कोरोनाशी लढा देणाऱ्या परिचारिकांची शासनाने योग्य दखल घ्यावी

कोरोनाशी लढा देणाऱ्या परिचारिकांची शासनाने योग्य दखल घ्यावी

सांगलीत शासकीय रुग्णालयात नर्सिंग फेडरेशनच्या वर्धापनदिनी परिचारिकांचा कोरोनायोद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. सुधीर नणंदकर, हाशमत हावेरी, प्रकाश गुरव, शैलजा सावर्डेकर आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटेवर्क

सांगली : वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वर्धापन दिनी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. फेडरेशनच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा हाशमत हावेरी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, उपअधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड, डॉ. रुपेश शिंदे, अधिसेविका सीमा चव्हाण, वंदना शहाणे, सहाय्यक अधिसेविका सुमित्रा चव्हाण, फेडरेशनच्या मिरज शाखेच्या अध्यक्षा प्रतिभा हेटकाळे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. नणंदकर यांनी फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन केले. हावेरी यांनी दीपप्रज्वलन केले. कोरोना काळात कोरोना बाधितांसाठी सेवा दिलेल्या परिचारिका वर्गातील कर्मचाऱ्यांना डॉ. नणंदकर व हावेरी यांच्याहस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हावेरी म्हणाल्या, कोरोना काळात परिचारिकांनी अतुलनीय कामगिरी केली. नोबल प्रोफेशन म्हटल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांची कामगिरी सर्वाधिक गाैरवाची ठरली. जीवाची जोखीम घेऊन रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचले. त्यांचा योग्य सन्मान शासकीय स्तरावर व्हायला हवा. त्यासाठी आपणही अधिक संघटित होऊ. डॉ. नणंदकर यांनीही परिचारिकांच्या कार्याचा गौरव केला.

फेडरेशनच्या सांगली शाखेच्या अध्यक्षा शैलजा सावर्डेकर, अजित शिंदे व सहकाऱ्यांनी संयोजन केले.

------------

Web Title: The government should take proper notice of the nurses who are fighting with Corona