शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ जमीनदोस्त; उरल्या आठवणी

By admin | Updated: May 8, 2015 00:15 IST

दिग्गजांची हजेरी : अनेक कलाकारांच्या अदाकारींचा ऐतिहासिक साक्षीदार

अंजर अथणीकर - सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणासमोर असलेल्या गोकुळ नाट्यगृहाचा ताबा मिळाल्यानंतर महापालिकेने ते जमीनदोस्त केले. यामुळे अनेक कलाकारांच्या अदाकारींचा ऐतिहासिक साक्षीदार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. १९६० च्या दरम्यान महापालिकेने या नाट्यगृहाची उभारणी केली. सुरुवातीला या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या संस्था नाटके सादर करीत असत. थिएटर तसे शंभर ते सव्वाशे प्रेक्षकांच्याच क्षमतेचे होते. त्यामुळे नाटकासाठी ही जागा अपुरी पडत होती. यानंतर दहा ते पंधरा वर्षांनी याठिकाणी जलसा सुरू झाला. महापालिकेने ही जागा ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने खासगी व्यक्तींना दिली. खासगी व्यक्तींनाही या नाटकाचे भाडे परवडत नसल्यामुळे १९९५ पासून तसे हे नाट्यगृह बंदच होते. महापालिकेने ही जागा परत मागितली. याचा ठेका घेतलेल्या कमलाबाई गवळी यांनी न्यायालयात दाद मागितली. नंतर हा वाद उच्च न्यायालयात गेला व हा दावा महापालिकेने जिंकला. त्यानंतर महापालिकेने ही जागा ताब्यात घेऊन २४ एप्रिल रोजी नाट्यगृह पाडून टाकले. यामुळे इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला.ज्येष्ठ संगीतकार बाळ पळसुले यांची कला या थिएटरमध्येच बहरत गेली. त्यानंतर त्यांनी शेकडो चित्रपटांना संगीत देऊन मराठी चित्रपट शौकिनांना मंत्रमुग्ध केले. अभिनेत्री उषा चव्हाण, मधू कांबीकर यांनीही याठिकाणी कला सादर केली आहे. याठिकाणी केवळ नाच-गाण्यांचा कार्यक्रम होत राहिला. यासाठी जयसिंगपूर, इचलकरंजी व विदर्भातूनही नाचे व त्यांच्या पार्ट्या येत. शौकिनांसाठी तीन व पाच रुपये तिकीट होते. पाच रुपयाचे तिकीट काढणाऱ्यांना पुढे खुर्चीवर जागा असे. नृत्यांगनांवर पैशाची उधळण व्हायची. नटून, थटून नाचणाऱ्या महिलांच्या घुंगरांचा खणखणाट रात्री आठ ते एकपर्यंत सुरू असायचा. शहर व परिसरातील शौकिनांची गर्दी असायची. शौकिनांची ने-आण करण्यासाठी याठिकाणी नव्याने रिक्षा स्टॉप झाला. चहाची टपरी, पान दुकानही आले. मात्र शौकिनांनी पाठ फिरवली आणि सर्व खेळ खल्लास झाला. नाट्यगृह वीस वर्षांपासून बंदच राहिले. चहाची टपरी, पान दुकानाला टाळे पडले. आता रिक्षा स्टॉप तेवढा राहिला आहे आणि त्याचे नाव ‘तरुण भारत रिक्षा स्टॉप’ असे करण्यात आले आहे. आता पाडलेल्या नाट्यगृहाच्या ठिकाणी काय होणार, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.