Sangli: बुधगावात गॅस कटरने एटीएम मशिन फोडले, १७ लाखांची रोकड लंपास 

By संतोष भिसे | Updated: May 21, 2025 17:28 IST2025-05-21T17:27:17+5:302025-05-21T17:28:28+5:30

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे बुधवारी पहाटे बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यात आले. चोरट्यांनी १७ लाख ४० हजारांची ...

Gas cutter breaks ATM machine in Budhgaon Sangli, cash worth Rs 17 lakhs stolen | Sangli: बुधगावात गॅस कटरने एटीएम मशिन फोडले, १७ लाखांची रोकड लंपास 

Sangli: बुधगावात गॅस कटरने एटीएम मशिन फोडले, १७ लाखांची रोकड लंपास 

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे बुधवारी पहाटे बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यात आले. चोरट्यांनी १७ लाख ४० हजारांची रोकड लंपास केली. गॅस कटरचा वापर करुण एटीएम फोडण्यात आले आहे.  बँकेकडून सायंकाळी उशिरा ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. तीन दिवसांपूर्वीच एटीएम मशीनमध्ये रोकड भरणा करण्यात आला होता. 

आज पहाटे चेहरा झाकलेला एक चोरटा एटीएममध्ये शिरला. त्याने सिसिटीव्ही कॅमेरा झाकला. त्यानंतर अन्य साथीदार आत शिरले. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्यात आले. त्यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड लंपास करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी एटीएम मशीनमध्ये बँकेकडून २९ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला होता. त्यात सुमारे १७ लाख ४० हजार रुपये शिल्लक होते. ही रोकड चोरट्यानी लंपास केली. 

दरम्यान हा प्रकार आज सकाळी गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपास सुरू केला आहे.

Web Title: Gas cutter breaks ATM machine in Budhgaon Sangli, cash worth Rs 17 lakhs stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.