पंचकल्याणमध्ये गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, संशयित कोल्हापूर, जयसिंगपूरच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 20:18 IST2025-05-28T20:17:01+5:302025-05-28T20:18:06+5:30

शकुंतला पाटील या हात धुण्यासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेऊन संशयित चोरट्या महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरले होते. 

Gang of women stealing ganthan arrested in Panchkalyan, suspects from Kolhapur, Jaysingpur | पंचकल्याणमध्ये गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, संशयित कोल्हापूर, जयसिंगपूरच्या

पंचकल्याणमध्ये गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, संशयित कोल्हापूर, जयसिंगपूरच्या

घनशाम नवाथे, सांगली 
दुधगाव (ता. मिरज) येथे पंचकल्याण महोत्सवात महिलेचे अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. महिला दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
संशयित लक्ष्मी बाळू सकट (वय २४, रा. राजेंद्रनगर, झोपडपट्टी, कोल्हापूर), दीपाली अशोक काळे (वय ४०, रा. संभाजीनगर, जयसिंगपूर), सोनू हरी काळे (वय ३५, रा. वाल्मीकी आवास, सांगली), शारदा बंटीनाथ हातळगे (वय ४, जयसिंगपूर) यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

दुधगाव (ता. मिरज) येथे दि. ८ मे रोजी पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलवाड (ता. मिरज) येथील शकुंतला शशिकांत पाटील या पूजेसाठी आल्या होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास जेवण विभागात जेवण करून शकुंतला पाटील या हात धुण्यासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेऊन संशयित चोरट्या महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरले. 

याबाबत पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ग्रामीण ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक चोरट्यांच्या मागावर होते. त्यांना चोरट्या महिलांची टोळी बुधगाव हायस्कूलजवळ दागिन्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून चोरीचे गंठण जप्त केले.

ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले, गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, सहायक फौजदार मेघराज रूपनर, अभिजीत पाटील, बंडू पवार, सचिन कोळी, मनोज नीळकंठ, हिंमत शेख, मनीषा कोरे यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Gang of women stealing ganthan arrested in Panchkalyan, suspects from Kolhapur, Jaysingpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.