शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत शिवाजी क्रीडांगणाचा खेळखंडोबा

By admin | Updated: September 13, 2015 00:18 IST

वर्षाआधीच होते बुकिंग : मैदानाच्या वापरावरून सुरू आहेत राजकीय कुरघोड्या...

सदानंद औंधे ल्ल मिरज महापालिकेच्या मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा खेळखंडोबा सुरू असून, मैदानाच्या आरक्षणासाठी एक वर्ष आधी भाडे भरून घेण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात जयंत चषक फुटबॉल स्पर्धेसाठी गतवर्षी मैदानाचे भाडे भरून घेण्यात आल्याची माहिती अधिकाराखाली स्पष्ट झाली आहे. मैदानाची रंगरंगोटी व दुरुस्तीसाठी साडेचार लाख रुपये खर्च कागदोपत्री दाखविण्यात आल्याची तक्रार आहे. मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगण महापालिकेचे एकमेव मैदान आहे. या मोठ्या मैदानावर फुटबॉल व क्रिकेट स्पर्धा सुरू असतात. विविध पक्ष, संघटनांतर्फे नेत्यांच्या वाढदिवसासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मैदानाच्या वापरासाठी महापालिकेकडून भाडे आकारण्यात येते. मात्र मैदानाच्या वापरासाठी राजकीय कुरघोड्या सुरू असून, विरोधकांना मैदान मिळू नये यासाठी वर्षभर आधी भाडे भरून मैदान आरक्षित करून ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या जयंत चषक फुटबॉल स्पर्धेसाठी मैदान कधी आरक्षित करण्यात आले, याची माहिती विचारल्यानंतर स्पर्धेसाठी गतवर्षीच्या जानेवारीत मैदानाचे भाडे भरण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मैैदानाच्या आरक्षणासाठी नियमांची विचारणा केली असता, असे कोणते नियमच नसल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. मैदानाची दुरूस्ती, रंगरंगोटी, माती टाकण्यासाठी साडेचार लाख रुपये खर्चाचे काम ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. मात्र कोणतीही दुरुस्ती व रंगरंगोटी न करता बिल काढण्यात आल्याची तक्रार विकास कुलकर्णी यांनी केली आहे. तक्रारीनंतर ठेकेदाराचे बिल थांबविण्यात आले आहे. मात्र मैदानाच्या दुरुस्तीसाठी कागदोपत्री खर्च करण्यात येत आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शिवाजी क्रीडांगणाची दुरवस्था झाली असून, मैदानावरील दिवे बंद आहेत. रात्रीच्या अंधारात व्यसनी, जुगारी, गुन्हेगारांचा येथे वावर आहे. मैदानाची दुरुस्ती व सुविधांच्या मागणीसाठी खेळाडूंनी आंदोलने केली आहेत.