तासगाव खून प्रकरणातील फरारी संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST2021-04-10T04:27:17+5:302021-04-10T04:27:17+5:30

लवेश धोत्रे या तरुणाचा खून झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २४ तासांत या खून प्रकरणातील संशयित महेश दत्तात्रय ...

Fugitive suspect arrested in Tasgaon murder case | तासगाव खून प्रकरणातील फरारी संशयितास अटक

तासगाव खून प्रकरणातील फरारी संशयितास अटक

लवेश धोत्रे या तरुणाचा खून झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २४ तासांत या खून प्रकरणातील संशयित महेश दत्तात्रय दानोळे (वय २०, वरचे गल्ली, तासगाव), विक्रांत हरी कांबळे (२५, रा. कांबळेवाडी, तासगाव), सागर बाबासाहेब कदम (२४, वरचे गल्ली, तासगाव), अनिकेत उदय चव्हाण (२२, वरचे गल्ली, तासगाव), सुनील हाजाप्पा कालेकर (२२, वरचे गल्ली, तासगाव) यांना अटक केली होती. मात्र ऋतिक शीतल शिंदे फरारी होता. शुक्रवारी शिंदे याला म्हैसाळ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

लवेशला भोसकल्यानंतर हल्लेखोर पसार झाले हाेते. या घटनेने तासगाव शहरात खळबळ उडाली हाेती. गेल्या काही महिन्यांपासून दोन गटांत सुरू असलेल्या वादातून हे कृत्य झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला आरोपी अंकलीमार्गे कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Web Title: Fugitive suspect arrested in Tasgaon murder case