शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ताकारीच्या दुसऱ्या आवर्तनाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: February 2, 2015 00:17 IST

साखर कारखान्यांच्या माध्यमातून वसुली : वीज बिलापोटी ९० लाख वर्ग

प्रताप महाडिक - कडेगाव - ताकारी योजनेचा वीजपुरवठा वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे वारंवार खंडित होत आहे. परंतु योजनेच्या लाभक्षेत्रातील ऊस गाळप करणाऱ्या सोनहिरा, उदगिरी, केन अ‍ॅग्रो आणि क्रांती या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून योजनेची पाणीपट्टी वसूल केली आणि तातडीने योजनेकडे ९० लाख रुपयांची रक्कम वर्ग केली. वीजबिल थकबाकी भरल्यावर योजनेचा वीज पुरवठा पूर्ववत होईल व दुसरे आवर्तनही आठवड्यात सुरू होईल.ताकारी योजना व परिसरातील कारखाने परस्परावलंबी आहेत. योजना पूर्ण क्षमतेने चालल्याशिवाय कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळत नाही आणि कारखान्यांनी वसुली केल्याशिवाय योजनेला पाणीपट्टी वसूल होत नाही, याचे भान ठेवून दोन्ही बाजूंनी परस्परांना योजनेच्या सुरुवातीपासून सहकार्य केले जाते.ज्या-ज्यावेळी वीजबिल थकबाकीअभावी योजना बंद पडली, त्या-त्यावेळी मोहनराव कदम, पृथ्वीराज देशमुख व अरुण लाड हे तिन्ही कारखानदार पाणीपट्टी वसुली करून योजनेकडे रक्कम वर्ग करतात. यामुळे योजना पुन्हा कार्यान्वित होते.सध्या योजनेची ९० लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. महावितरणने योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. रब्बी पिकांसह ऊस शेतीही धोक्यात आहे. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले. यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून योजनेची पाणीपट्टी वसुली केली आणि योजनेकडे वर्ग केली.यामध्ये सोनहिरा साखर कारखान्याकडून ५० लाख, क्रांती कारखान्याकडून ३० लाख आणि केन अ‍ॅग्रो कारखान्याकडून १० लाख अशी जवळपास एक कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली करून योजनेकडे वर्ग केली आहे. आता योजनेकडून कृष्णा खोरे विकास महामंडळही रक्कम महावितरणकडे भरेल आणि वीज पुरवठा पूर्ववत होईल. ६ फेब्रुवारीपर्यंत योजनेचे दुसरे आवर्तनही सुरू होणार आहे. ताकारी उपसा सिंचन योजनेची पाणीपट्टी आकारणी, वसुली ही कामे कार्यक्षमपणे करण्यासाठी स्वतंत्र सिंचन विभागाची गरज आहे. टेंभू योजनेला स्वतंत्र सिंचन विभाग मंजूर झाला आहे. परंतु तिथेही कर्मचारी वर्ग अपुरा आहे. ताकारी योजनेलाही लाभक्षेत्राची पारदर्शक पध्दतीने मोजणी, पाणीपट्टी आकारणी व वसुली होणे गरजेचे आहे. याशिवाय लाभक्षेत्र दडवणाऱ्या बड्या शेतकऱ्यांनीही प्रामाणिक लाभक्षेत्राची पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे.