शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील चोवीस तास पाणी गेले कुठे?

By admin | Updated: September 24, 2015 00:09 IST

योजनेचा फियास्को : हवेवर फिरतात मीटर; महापालिकाच करते देखभाल-दुरुस्तीचे काम

 सांगली : सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्चून विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याचे महापालिकेचे स्वप्न भंगले आहे. चोवीस तास नव्हे, तर आता तास, दोन तासच पाणी नागरिकांना मिळत असून पाण्याचे बिल मात्र वारेमाप येत आहे. त्यामुळे या भागातील अनेक नागरिकांनी बिल भरण्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यात ठेकेदारानेही देखभाल-दुरुस्तीचे काम थांबविल्याने महापालिकेलाच गळती व इतर कामे करावी लागत आहेत. महापालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडीच्या सत्ताकाळात मोठा गाजावाजा करीत विश्रामबाग परिसरातील चार प्रभागात चोवीस तास पाणी देण्याची योजना आखण्यात आली. राज्य शासनाच्या सुजल निर्मल योजनेतील सुमारे साडेआठ कोटीचा निधी या प्रकल्पावर खर्च करण्यात आला. अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेचे पुनर्वसन, बल्क मीटर बसविणे यासह दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचा ठेका एका कंपनीला देण्यात आला. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास संपूर्ण शहरात पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्याचा ठरावही महाआघाडीच्या काळात झाला होता. पण आता पाच वर्षानंतर या योजनेचा फियास्को झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्रामबाग परिसरातील साडेचार हजार ग्राहकांना चोवीस तासांपैकी सकाळी तास ते दोन तास पाणी मिळते. ठेकेदाराचे बिलही महापालिकेकडे अडकले आहे. त्यामुळे त्याने देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी झटकली असून आता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडूनच देखभाल-दुरुस्ती केली जात आहे. पाण्याची गळती काढण्याच्या कामात ठेकेदाराने कुचराई केल्याचे प्रशासनाने सांगितले. त्याला वार्षिक फी दिली जात होती. त्यातही पालिकेने कपात केल्याचे सांगितले. या योजनेतून चोवीस तास पाणी मिळत नसल्याने नागरिकांनीही बिले भरण्यास नकार दिला आहे. त्यात पाण्याचे मीटर हवेवर फिरत असल्याने नागरिकांना अवाच्या सवा बिले मिळत होती. त्याबद्दल संतापही व्यक्त झाला होता. तरीही महापालिका प्रशासनाने हवेवर मीटर फिरते, ही बाब कधी गांभीर्याने घेतलीच नाही. अखेर नगरसेवक प्रदीप पाटील यांनी तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता सुनील पाटील यांच्यासह विश्रामबागमधील मीटर्सची समक्ष पाहणी केली, तेव्हा हवेवर मीटर फिरत असल्याचे अधिकाऱ्यांनी पाहिले होते. ही योजना यशस्वी होण्यासाठी पाण्याची टाकी सातत्याने भरलेली हवी; पण या योजनेवरील दोन्ही टाक्या पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. दोन्ही टाक्यांना एक्स्प्रेस फिडरची आवश्यकता आहे. त्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नदीतून उचललेले पाणी, त्यानंतर जलशुद्धीकरण करून दिलेले पाणी यात मोठी तफावत आहे. जलशुद्धीकरणाचे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय नागरिकांना जादा पाणी देणे शक्य होणार आहे. अशा तांत्रिक अडचणीत ही योजना अडकली आहे. चोवीस तास पाण्याचा पुरता बोजवारा उडाला असून, किमान चार तास तरी पाणी मिळावे, अशी अपेक्षा विश्रामबागकर करीत आहेत. (प्रतिनिधी)प्रशासनाचे दुर्लक्षपाणी योजनेतून नागरिकांना चोवीस तास पाणी मिळत नाही. सकाळी तासभर पाणी येते. सायंकाळी पाणी मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. याबाबत प्रदीप पाटील यांनी ठेकेदार, अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती; पण त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. उलट पाटील यांच्या अनुपस्थितीत आयुक्तांनी बैठक घेतली. पुन्हा बैठकीचे नियोजन अद्यापपर्यंत झालेले नाही. ठेका रद्दची मागणीविश्रामबाग परिसरातील नगरसेवक प्रदीप पाटील यांनी पाणी योजनेचा ठेका रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्यात हवेवर मीटर फिरत असल्याने नागरिकांना नाहक भुर्दंड बसतो. ही बिलेही वेळेवर दुरुस्त करून दिली जात नाहीत. मीटर बदलण्याची मागणी करून वर्ष झाले, तरी प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही प्रदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.