Sangli: शिंदेसेनेच्या शहरप्रमुखास मारहाणप्रकरणी चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:03 IST2026-01-14T17:02:29+5:302026-01-14T17:03:15+5:30
सांगली : शिंदेसेना शहरप्रमुख सचिन कांबळे यांना विनाकारण मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयित नितीन कुरळपकर (रा. पोद्दार स्कूलजवळ), ...

Sangli: शिंदेसेनेच्या शहरप्रमुखास मारहाणप्रकरणी चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
सांगली : शिंदेसेना शहरप्रमुख सचिन कांबळे यांना विनाकारण मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयित नितीन कुरळपकर (रा. पोद्दार स्कूलजवळ), सुशांत ऊर्फ बॉबी चंदनशिवे, विशाल दरगावकर व अनोळखी अशा चौघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सचिन कांबळे व मित्र जयदीप पाटील हे दोघेजण सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता बालाजीनगर येथे थांबले होते. तेव्हा संशयित कुरळपकर व साथीदार तेथे आले. तेव्हा काही कारण नसताना सुशांत ऊर्फ बॉबी, विशाल दरगावकर व अनोळखी तरुणाने सचिन यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तर कुरळपकर याने जातिवाचक शिवीगाळ करून दमदाटी केल्याची फिर्याद कांबळे यांनी दिली आहे.
त्यानुसार कुरळपकर, सुशांत ऊर्फ बॉबी, विशाल दरगावकर व अनोळखी अशा चौघांविरुद्ध संजयनगर पोलिसांनी बीएनएस ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) आणि ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित नितीन कुरळपकर, विशाल दरगावकर हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. संजयनगर पोलिस तपास करीत आहेत.