Sangli: काळ्या पैशाच्या व्यवहारात नाव, ऑडिटच्या नावाखाली माजी सैनिकाला साडेपंधरा लाखांचा गंडा, तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:42 IST2024-12-28T16:41:46+5:302024-12-28T16:42:51+5:30

अटकेची घातली भीती

Former soldier duped of Rs 15 lakh by impersonating CBI officers | Sangli: काळ्या पैशाच्या व्यवहारात नाव, ऑडिटच्या नावाखाली माजी सैनिकाला साडेपंधरा लाखांचा गंडा, तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून फसवणूक

Sangli: काळ्या पैशाच्या व्यवहारात नाव, ऑडिटच्या नावाखाली माजी सैनिकाला साडेपंधरा लाखांचा गंडा, तोतया सीबीआय अधिकाऱ्यांकडून फसवणूक

कुरळप : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून वशी येथील माजी सैनिकाची १५ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याची धाकादायक घटना उघडकीस आली. रविकुमार व नवजीत सिन्ही असे संशयित तोतया अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत सेवानिवृत्त विक्रम वसंत पोतदार (रा. वशी, ता वाळवा, जि. सांगली) यांनी गुरुवार (दि. २६) कुरळप पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार एक ते तीन ऑगस्ट २०२४ रोजी रविकुमार व नवजीत सिन्ही यांनी वेळोवेळी त्यांच्या मोबाईलवरून, 'मी सीबीआय मुंबई विभागातून आयपीएस अधिकारी बोलत आहे. तुमचे काळ्या पैशाच्या व्यवहारात संशयित म्हणून नाव आले आहे. यामुळे तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याची पोतदार यांना भीती घातली.

तुमच्या खात्यावरील रकमेचे ऑडिट करण्याचे आहे, असे भासवून विक्रम पोतदार यांच्याकडून १५ लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे घेऊन फसवणूक केल्याचे पोतदार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीनुसार दोघा संशयितांवर गुरनं २३८/२०२४ बीएनएस ३(५) ३१८(२) नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास कुरळप पोलिस करत आहेत.

Web Title: Former soldier duped of Rs 15 lakh by impersonating CBI officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.