शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

फुलांच्या बाजारात मारामारी

By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST

मिरजेतील प्रकार : सुविधांअभावी शेतकऱ्यांची गैरसोय

मिरज : जिल्ह्यात एकमेव असलेल्या मिरजेतील फुलांच्या बाजारात सोयी-सुविधा नसल्याने फूल उत्पादक शेतकरी व विक्रेते हैराण आहेत. पावसाने झालेल्या चिखलात फुलाचे पोते पडल्याच्या कारणावरून आज (बुधवारी) दोन शेतकऱ्यांत झालेल्या मारामारीमुळे फुलांच्या बाजारात तणाव निर्माण झाला होता. मिरज पूर्व भागातील विविध गावांत गुलाब, झेंडू, निशिगंध, लिली या फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. फुलांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात असल्याने मिरजेत दररोज फुलांचा बाजार भरतो. पंढरपूर कोल्हापूरनंतर मिरजेतच फुलांचा बाजार भरत असल्याने कर्नाटक, कोकणसह सोलापूर जिल्ह्यातून फुले खरेदीसाठी व्यापारी मिरजेत येतात. मिरजेतील दुय्यम बाजार आवारात दररोज सकाळी भरणाऱ्या फूल बाजारासाठी मार्केट समिती व्यापाऱ्यांकडून भाडे आकारणी करते; मात्र आवश्यक सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. पावसाचे पाणी साचून बाजारात चिखल होतो. बाजाराच्या मोकळ्या जागेत चिखल होऊ नये यासाठी व्यवस्था करून पत्र्याचे शेड व रस्त्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे बाजार समितीचे दुर्लक्ष आहे. सध्या दसऱ्यासाठी झेंडू, निशिगंधा, लिली, गुलाब यांची लाखोची उलाढाल होत आहे. मात्र बाजारात सुविधांअभावी विक्रेते व शेतकरी त्रस्त आहेत. बाजारात फुलांच्या पोत्याला धक्का लागून फुले चिखलात पडल्याच्या कारणावरून तानंग व मालगाव येथील दोन शेतकऱ्यांत हाणामारी झाली. बाजाराचा आखाडा झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला. शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी आंदोलन करणार असल्याचे नंदकुमार म्हेत्रे यांनी सांगितले. (वार्ताहर)कर्नाटकातून खरेदीफुलांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात असल्याने मिरजेत दररोज फुलांचा बाजार भरतो. पंढरपूर, कोल्हापूरनंतर मिरजेतच फुलांचा बाजार भरत असल्याने कर्नाटक, कोकणसह सोलापूर जिल्ह्यातून फुले खरेदीसाठी व्यापारी येतात.