शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रेणावी घाटातील खूनप्रकरणी पाच जणांना अटक

By admin | Updated: September 11, 2015 23:04 IST

या खुनाचा तब्बल चार वर्षानंतर छडा लावण्यात विटा पोलिसांना गुरूवारी यश आले होते.

विटा : खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात चार वर्षापूर्वी घडलेल्या दिराच्या खूनप्रकरणी विटा पोलिसांनी फरारी पाच संशयितांना शुक्रवारी सकाळी अटक केली. त्यामुळे या घटनेतील अटक केलेल्या आरोपींची संख्या सातवर पोहोचली असून या संशयितांना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.कर्नाटकातील माणकापूर (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथील शशिकांत ऊर्फ सदाशिव रामचंद्र यादव (वय ३५) या तरुणाचा ४ फेब्रुवारी २०११ रोजी खून झाल्याची घटना घडली होती. या खुनाचा तब्बल चार वर्षानंतर छडा लावण्यात विटा पोलिसांना गुरूवारी यश आले होते. शशिकांतचा खून त्याची भावजय सौ. वर्षा नाईकबा यादव (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) हिने २० हजाराची सुपारी देऊन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावेळी खुनाची सुपारी हणमंत रामा मगदूम (रा. तारदाळ, ता. हातकणंगले) याला दिल्याचेही वर्षाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गुरूवारी वर्षा हिच्यासह सुपारी घेणारा हणमंत मगदूम या दोघांना अटक केली. त्यावेळी तपासात या प्रकरणातील अन्य साथीदारांची नावेही उघडकीस आली होती.शुक्रवारी सकाळी या घटनेतील मनोज तानाजी जगदाळे (२६), किशोर सुकुमार जगदाळे (२८), पंकज वसंत जोशी (२९, सर्व रा. संगमनगर, तारदाळ, जि. कोल्हापूर), चंद्रकांत मारूती कुरणे (२६, शिवनाकवाडी, शिरोळ) व प्रवीण बाळासाहेब पाटील (२३, रा. जगदाळे मळा, तारदाळ, जि. कोल्हापूर) या पाच संशयितांना अटक केली. या सर्व संशयितांना पोलीस बंदोबस्तात शुक्रवारी विटा न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि. १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पोलीस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)पोलीस प्रमुखांकडून विटा पोलिसांना बक्षीसरेणावी घाटातील चार वर्षापूर्वीच्या खुनाचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आले. अत्यंत निर्घृणपणे खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी करूनही विटा पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावला. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी विटा पोलीस ठाण्यास भेट देऊन या खून प्रकरणाची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तपासाबाबत काही टिप्स व मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक फुलारी यांनी चार वर्षापूर्वीचा खून उघडकीस आणल्याबद्दल पोलीस निरीक्षक मोहन जाधव व त्यांच्या टीमचे अभिनंदन करून विटा पोलिसांना या तपासाबद्दल बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले.