शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर बाजार समितीत पहिल्यांदाच बोरगावची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2015 01:13 IST

विरोधी महाआघाडीचाही उमेदवार नसल्याने उलट—सुलट चर्चा सुरू आहे.

नितीन पाटील -बोरगाव--इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रथमच बोरगाव (ता. वाळवा) गटातून उमेदवार दिलेला नाही. अपेक्षित उमेदवार बदलत्या राजकीय समीकरणाने उपेक्षित राहिल्याचे दिसत आहे. येथून विरोधी महाआघाडीचाही उमेदवार नसल्याने उलट—सुलट चर्चा सुरू आहे.बोरगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रबळ दोन गट कार्यरत आहेत. आजपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध होत होत्या. यावेळी राष्ट्रवादीविरोधात महाआघाडी स्थापन करून काँग्रेससह सर्व पक्षांनी मोट बांधली असली तरी, बोरगाव गटातून मात्र ना काँग्रेसचा उमेदवार, ना राष्ट्रवादीचा उमेदवार दिसत आहे. तालुक्याच्या राजकारणात या गावाचे मोठे योगदान आहे. त्यामानाने पदेदेखील दिली आहेत. बाजार समितीच्या स्थापनेपासून बोरगावला स्थान कायम असायचे. अध्यक्षपदही बोरगावच्या वाट्याला आले होते. यावेळी मात्र संचालक पदाची स्वपे्न पाहणाऱ्या इच्छुकांचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादी अथवा काँग्रेसकडून का उमेदवारी दिली गेली नाही, याचे गूढ मात्र कायम आहे. काँग्रेसचे नेते, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या काँग्रेसला सक्षम नेतृत्व नाही. रोज एकाबरोबर चूल मांडली जाते, हे योग्य नाही. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीबाबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.- प्रतापराव मोरे, काँग्रेस नेते, रेठरेहरणाक्ष.काँग्रेसचे पदाधिकारी प्रतापराव मोरे, किरण चव्हाण, निवास पाटील (शिगाव) व अन्य कार्यकर्त्यांशी चर्चा करून बाजार समिती निवडणुकीबाबत योग्यवेळी निर्णय घेणार आहे.- जितेंद्र पाटील, संचालक, कृष्णा कारखाना.आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बाजार समिती निवडणुकीसंदर्भातील सर्व निर्णय झाले आहेत. ज्या गावाला यापूर्वी संधी मिळाली नाही, अशा गोटखिंडी, पेठ, ऐतवडे, कणेगाव, आष्टा, येडेमच्ंिंछंद्र या गावांना संधी देऊन राजकीय भाकरी परतण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळेच यावेळी बोरगावला संधी मिळालेली नाही.- संजय पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष.