शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर विठलापूरचा पाणीप्रश्न मिटला!

By admin | Updated: May 19, 2015 00:25 IST

विहिरीचे अधिग्रहण : आजपासून पाणीपुरवठा --लोकमतचा दणका

अविनाश बाड - आटपाडी -विठलापूर (ता. आटपाडी) येथील पाणीटंचाईने हैराण झालेल्या ग्रामस्थांना आज (सोमवारी) तातडीने प्रशासकीय हालचाली झाल्याने आता दिलासा मिळणार आहे. विठलापूरला तातडीने विहीर अधिग्रहण केली आहे. यामुळे मंगळवार दि. १९ पासून गावाला पाणी सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे टेंभूचे पाणी सोडलेल्या ओढ्याकाठावरील विहीर अधिग्रहण केल्याने येत्या काही दिवसांपर्यंत तरी गावाची पाणीटंचाईपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे.आटपाडीपासून केवळ ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाला गेल्या २ महिन्यापासून तीव्र पाणीटंचाईने विळखा घातला होता. १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला गेल्याने ग्रामस्थांवर उन्हाळ्यात दाहीदिशा पाण्यासाठी फिरण्याची वेळ आली. ‘लोकमत’ने सोमवार दि. १८ मे च्या अंकात विठलापूरच्या पाणीटंचाईची वेदना प्रसिध्द केली.या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यु. एस. काळे, विस्तार अधिकारी एस. आर. पाटील, ग्रामसेवक एस. आर. वळवी, डी. बी. देशमुख यांनी विठलापूरला भेट दिली व प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी केली.दरम्यान, तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी त्यांच्याकडे प्रस्तावित असलेला विहीर अधिग्रहण करण्याचा आदेश काढला. मात्र त्या विहिरीस पाणी कमी असल्यामुळे सुरेश तुकाराम आटपाडकर यांची विहीर अधिग्रहण करण्याचे ठरले.दरम्यान, रामभाऊ युवा मंचचे सिध्देश्वर बाड, नवनाथ जावीर, शिवलिंंग बाड, साहेबराव चंदनशिवे, अनिल बाड, बालाजी बाड यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदार कट्यारे यांना भेटून, येत्या दोन दिवसात पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात आली नाही, तर बुधवार दि. २० मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. विठलापूर गावच्या ओढ्यातील सर्व विहिरींची पाणी असलेल्या शेतकऱ्याची विहीर अधिग्रहण केली आहे. आम्ही १५ दिवसांपूर्वीच विहीर अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. उद्या तातडीने जलवाहिनी जोडून पाणीपुरवठा करण्यात येईल.- सौ. मीना साळुंखे, गटविकास अधिकारी, आटपाडी ‘लोकमत’चे अभिनंदनविठलापूरमध्ये दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईने ग्रामस्थांना अगदी सळो की पळो करून सोडले. प्रशासनाचे मात्र या पाणीटंचाईकडे दुर्लक्ष झाले. ‘लोकमत’मध्ये याचे वृत्त सोमवार दि. १८ रोजी प्रसिध्द झाल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. मंगळवारपासून गावाला पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे.