शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पासाठी तज्ज्ञ समिती

By admin | Updated: May 8, 2015 00:41 IST

हरित न्यायालयाने पुन्हा फटकारले : सांगली महापालिकेचा आराखडा फेटाळला

सांगली : घनकचऱ्याप्रश्नी तयार केलेला प्रकल्प आराखडा गुरुवारी हरित न्यायालयाने फेटाळून लावत महापालिकेला पुन्हा एकदा फटकारले. नव्याने आराखडा तयार करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट, पवई (मुंबई) येथील आयआयटी आणि सांगलीतील वालचंद महाविद्यालय यांची तज्ज्ञ समिती नियुक्त केली असून, त्यांना महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने १५ वर्षांत घनकचरा प्रकल्प राबविला नसल्याने जिल्हा सुधार समितीने हरित न्यायालयात धाव घेतली होती. समितीचे प्रा. आर. बी. शिंदे, अ‍ॅड. अमित शिंदे यांनी, घनकचरा प्रकल्प राबवावा, अशी मागणी न्यायालयात केली. त्यावर न्यायालयाने महापालिकेला फटकारत ६० कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे सादर करण्याचे आदेश दिले. त्यापैकी २० कोटी रुपये महापालिकेने जमा केले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या धर्तीवर घनकचरा प्रकल्पाचा आराखडाही तयार केला होता. गुरुवारी हरित न्यायालयाच्या सुनावणीवेळी महापालिकेने घनकचरा आराखडा सादर केला; पण न्यायालयाने हा आराखडा फेटाळून लावला. महापालिकेची, घनकचरा प्रकल्पाबाबत गांभीर्याने कार्यवाही सुरू असून, ई-कचरा प्रकल्पाची छायाचित्रे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा सुधार समितीने याचिका दाखल केल्यानेच महापालिकेने तत्परता दाखविली असल्याचे मत नोंदवित न्यायालयाने पालिकेचे कान उपटल्याचे समितीचे प्रा. शिंदे व अमित शिंदे यांनी सांगितले. हरित न्यायालयाने घनकचरा प्रकल्पासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीत पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट आॅफ कॉमर्स, मुंबईतील आयआयटी व सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयासह या विषयातील तज्ज्ञांचा समावेश आहे. प्रकल्पासाठी एका ठिकाणी कचरा साठविणे व वर्गीकरण करणे अशी प्रक्रिया होईल, तर दुसऱ्या ठिकाणी सेंद्रिय खतनिर्मिती करावयाची आहे. प्रकल्प आराखड्यासह कंपन्यांची नियुक्ती व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने ३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. (प्रतिनिधी)कंपन्या अविश्वासार्हमहापालिका प्रशासनाने घनकचराप्रश्नी सुरू केलेल्या कार्यवाहीची माहिती हरित न्यायालयात दिली. एका सिमेंट कंपनीने कचऱ्यापासून जळाऊ इंधन तयार करण्याचा प्रस्ताव दिल्याचे निदर्शनास आणून दिले. आणखी काही कंपन्या संपर्कात असल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने, या कंपन्या विश्वासार्ह नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांचा इतर ठिकाणचा अनुभव वाईट आहे. काही कंपन्यांना दंडही झाल्याचे नमूद केले, असे प्रा. शिंदे व अमित शिंदे यांनी सांगितले.