शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर टेंभू योजनेचे आवर्तन सुरू

By admin | Updated: August 18, 2015 00:40 IST

पावणेचार कोटी थकबाकी : कारखान्यांकडून सव्वादोन कोटी

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोमवारपासून सुरू झाले. यामुळे योजनेच्या ४५०० हेक्टर लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे. योजनेची ३ कोटी ७५ लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. ही वीजबिल थकबाकी तातडीने भरा, अशी नोटीस महावितरणने पाटबंधारे विभागाला दिली आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केलेली २ कोटी २५ लाख रुपये इतकी पाणीपट्टी योजनेकडे जमा केली आहे. शिवाय आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील ५१ लाख रुपये पाणीपट्टी योजनेकडे जमा आहेत. अद्याप कारखान्यांकडून पाणीपट्टी येणेबाकी आहे. ही बाकीसुद्धा भरू, असे कारखान्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील पिके कोमेजून गेली होती. योजनेचे आवर्तन सुरू करा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. योजनेची ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे. यातून ३ कोटी ७५ लाख रुपये वीज थकबाकी भरणे शक्य आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी आवर्तन सुरू केले. कडेगाव तालुक्यासह खानापूर, आटपाडी व सांगोला तालुक्यापर्यंत या आवर्तनाचे पाणी दिले जाणार आहे. केन अ‍ॅग्रो साखर कारखान्याने १ कोटी ४० लाख रुपये शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वसूल झालेली पाणीपट्टी भरली आहे. सोनहिरा कारखान्याने ५० लाख, ग्रीन पॉवर शुगर, गोपुज कारखान्याने २५ लाख रुपये वसूल पाणीपट्टी भरली आहे. शिवाय आटपाडी आणि सांगोला तालुक्यातून ५१ लाख रुपये पाणीपट्टी भरली आहे. अद्यापही विजबिलासाठी १ कोटी कमी पडतात. परंतु कारखान्यांनी उर्वरित वसुली पाणीपट्टी तात्काळ देण्याची जबाबदारी घेतली आहे. यामुळे आवर्तनात कोणताही अडथळा येणार नाही. (वार्ताहर) टंचाईतून आवर्तन मिळणार? राज्याच्या टंचाई उपाययोजना निधीतून टंचाई काळातील आवर्तन देण्याचा शासन निर्णय झाला आहे. याप्रमाणे ताकारी, टेंभू योजनेचे चालू आवर्तन टंचाई उपाययोजना निधीतून मिळणार का? याबाबत लाभक्षेत्रात चर्चा आहे. तसा प्रस्ताव योजनेकडून शासनाकडे गेला आहे. परंतु यावर अंतिम निर्णय होईल, असे अपेक्षित आहे.